Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा संगीत अनावरण सोहळा

मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमेचा लवकरच ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो मराठी शाळांवर आधारित आहे. या चित्रपटाचा नुकताच संगीत अनावरण सोहळा पार पडला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 11, 2025 | 11:56 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चा संगीत अनावरण सोहळा
  • हेमंत ढोमेच्या शाळेत पार पडला कार्यक्रम
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘शाळा मराठी’ला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता दुसरं गीत ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे शाळेतल्या आठवणींना उजाळा देणारं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा अनावरण सोहळा अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेतील पटांगणात पार पडला. या शाळेत गाण्याचं अनावरण करण्याचं कारण म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमेचे या शाळेशी असलेलं अतूट आणि गोड नातं.

 

हेमंत ढोमे या शाळेत शिकला असून, दिग्दर्शकाच्या अनेक आठवणी या शाळेशी जोडल्या असून हेमंत यांनी पहिल्यांदा नाटकात काम केलं ते याच शाळेच्या मंचावर मोठे झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक जिव्हाळ्याचा सोहळा असून शाळेला दिलेली एक मानवंदना आहे. यावेळी क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, कादंबरी कदम यांच्यासह गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर, संगीतकार हर्ष- विजय उपस्थित होते. या खास सोहळ्यात चित्रपटातील कलाकार हजारो विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर थिरकले. विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि मैदानात दुमदुमलेल्या आनंदी वातावरण गाण्याचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. शिक्षक, विद्यार्थी आणि चित्रपटाची टीम सगळ्यांनी मिळून हा क्षण संस्मरणीय बनवला.

सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात घेतली धाव; बनावट कंटेंट आणि फेक डीपी बनली डोकेदुखी

सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं हे कालातीत गीत आजही प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याच्या मनात घर करून आहे. संगीतकार हर्ष-विजय यांनी या लोकप्रिय गाण्याला आधुनिक आणि नॉस्टॅल्जिक असा सुंदर स्पर्श देत नव्याने गाणं सादर केलं आहे. गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या आवाजातील मधुर भावस्पर्शी गोडवा या घेण्यात उतरला आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे या सुंदर अनुभवाबद्दल म्हणाले, ”वडिलांच्या पोलीस खात्यातील नोकरीमुळे माझे पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले. आज सिनेक्षेत्रात काम करताना तो दिवस आठवतो, जेव्हा मी पहिल्यांदा नाटकात काम केलं, जे आपल्या शाळेच्या मंचावर होतं. दिवंगत परांजपे सरांनी हाताला धरून मला त्या मंचावर उभं केलं होतं. सरांचे आणि शाळेचे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. मी कायमचा त्यांचा ऋणी असेन. आपल्या शाळेसाठी काही करावे, माझी शाळा कुठली, हे अभिमानानं सांगावं, असं कायमच वाटायचं आणि या चित्रपटाच्या निमित्तानं ही संधी मला मिळाली. माझ्या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा याच शाळेत करण्याची माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी शाळेचा मनापासून आभारी आहे.”

तुम्ही पाकिस्तानला कधी येणार? Pak चाहत्याचा Alia Bhatt ला प्रश्न; अभिनेत्रीचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. अभिनेत्री क्षिती जोग निर्माता आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Web Title: The music launch of krantijyoti vidyalaya marathi madhyam took place at director hemant dhome school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Virar :  पोलिसांच्या पाठपुराव्याला यश;  25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती
1

Virar : पोलिसांच्या पाठपुराव्याला यश; 25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Ahilyanagar News: ‘बेटी बचाव’ फक्त फक्त घोषणा ठरणार का? छेडछाडीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण
2

Ahilyanagar News: ‘बेटी बचाव’ फक्त फक्त घोषणा ठरणार का? छेडछाडीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण

Bigg Boss Marathi 6: तिसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात येणार वाइल्ड कार्ड? प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
3

Bigg Boss Marathi 6: तिसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात येणार वाइल्ड कार्ड? प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

‘हेच जिवंत असताना का नाही केलंत…?’ सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री दिल्याबद्दल Sumeet Raghavan ची नाराजी
4

‘हेच जिवंत असताना का नाही केलंत…?’ सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री दिल्याबद्दल Sumeet Raghavan ची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.