Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिली केस, मोठी जबाबदारी, उज्ज्वल निकम यांच्या मदतीने अॅड ऊर्जा करणार पहिल्या केसची तयारी

पहिली केस लढण्यापूर्वी ऊर्जाने प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. न्यायाच्या वाटेवर पाऊल टाकताना ऊर्जासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची ठरली.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 13, 2026 | 07:22 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहवर नवीन सुरू झालेली मालिका वचन दिले तू मला, ही मालिका खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. न्यायासाठी लढणारी, ध्येयवेडी आणि आत्मविश्वासू अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची केस लढण्यासाठी सज्ज होत आहे. पहिली केस लढण्यापूर्वी ऊर्जाने प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. न्यायाच्या वाटेवर पाऊल टाकताना ऊर्जासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची ठरली.

या भेटीविषयी सांगताना ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाली, ‘उज्वल निकम सरांना भेटून मनापासून आनंद झाला. त्यांनी दिलेला वेळ, प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेन अशी भावना अनुष्काने व्यक्त केली.’

2026 दीपिकासाठी खास ठरणार? दीपिका पादुकोण किंग आणि ‘या’ प्रोजेक्ट्समध्ये झळकणार; आगामी चित्रपटाची प्रचंड उत्सुकता

खास बाब म्हणजे, निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात ऊर्जा न्यायालयात उभी राहणार आहे. ऊर्जाचा ही पहिली केस केवळ एक खटला न राहता, न्यायासाठीचा एक निर्णायक संघर्ष ठरणार आहे. या संघर्षात ऊर्जा स्वतःला कशी सिद्ध करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘वचन दिले तू मला’ ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू झाली आहे. यात अभिनेत्री अनुष्का सरकटे मुख्य भूमिका साकारत आहे, तर अभिनेता इंद्रनील कामत वकीलाच्या भूमिकेत दिसतो; त्याच्या पात्राचे नाव शौर्य आहे. खास गोष्ट म्हणजे, मालिकेत मिलिंद गवळी खलभूमिकेत आहेत; तो ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध देशमुखच्या भूमिकेसाठी ओळखला जातो.

ही मालिका 15 डिसेंबर रोजी पहिल्या एपिसोडसह प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेनंतर स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु झाली. अभिनेत्री अनुष्का सरकटे यापूर्वी ‘36 गुणी जोडी’ मालिकेद्वारे प्रसिद्ध झाली होती, जिथे तिच्यासोबत बिग बॉस मराठी फेम आयुष संजीव दिसला होता.

Talwiinder-Disha Patani: टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा पटानी पुन्हा प्रेमात? 5 वर्षांनी लहान गायकासोबतचा Video व्हायरल

Web Title: With the support of ujjwal nikam advocate urja is preparing for her first case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • marathi serial news
  • star pravah
  • Ujwal nikam

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: इंद्रायणीची सर्वात मोठी कसोटी, दिग्रसकर घराण्याची प्रतिष्ठा आणि सत्याची लढाई
1

Colors Marathi Serial: इंद्रायणीची सर्वात मोठी कसोटी, दिग्रसकर घराण्याची प्रतिष्ठा आणि सत्याची लढाई

“मी स्वतः एका मुलीचा वडील म्हणून …” शुभ श्रावणी मालिकेतील पात्राबद्दल लोकेश गुप्तेंनी सांगितली खास गोष्ट, म्हणाले…
2

“मी स्वतः एका मुलीचा वडील म्हणून …” शुभ श्रावणी मालिकेतील पात्राबद्दल लोकेश गुप्तेंनी सांगितली खास गोष्ट, म्हणाले…

मकरसंक्रांत विशेष: ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’चा महासंगम, झी मराठीवर ७ दिवस ७ खुलासे
3

मकरसंक्रांत विशेष: ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’चा महासंगम, झी मराठीवर ७ दिवस ७ खुलासे

Exclusive: महत्त्वाची आणि आव्हानात्मक भूमिका, हळवी पण निर्भिड आजी – इला भाटे
4

Exclusive: महत्त्वाची आणि आव्हानात्मक भूमिका, हळवी पण निर्भिड आजी – इला भाटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.