
झी मराठीवरील तारिणी आणि कमळी या दोन्ही मालिकांचा महासंगम सुरु आहे. 10 ते 14 नोव्हेंबरपर्य़ंत या दोन्ही मालिकांचा महासंगम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. कमळी मालिकेतील अनिकाने कमळीला त्रास देण्यासाठी कॉलेजमध्ये ड्रग्ज आणले आणि या प्रकरणात खोट्या आरोपांखाली कमळीला अडवण्याचा प्रयत्न केला. यात कारस्थान साथ देणारी कामिनी आणि रागिणी यांनी दिली. मात्र सत्य फार काळ लपत नाही. कमळीच्या मदतीला तारिणी आणि कौशिकी धावून आल्या. हा महासंगम आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत आहे.
कौशिकी खांडेकर ही सत्याच्या बाजूने असलेली पत्रकार अन्नपुर्णा महाविद्यालयाची विद्यार्थीनी होती असं या दोन्ही मालिकेच्या महासंगमात दाखवण्यात आलेलं आहे. आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो तिथले विद्यार्थी ड्रग्जच्या विळख्यात अडकत जात असल्याची माहिती मिळतात कौशिकी सगळी सूत्र कामाला लावते. ड्रग्जप्रकरण वाटतं तितकं सोपं नाही हे कौशिकी आणि तारिणीला कळून चुकतं. तारिणी आणि संपूर्ण टीम या ड्रग्जप्रकरणातील गुन्हेगारांना शोधण्याची मोहिमेवर आहेत. मात्र एवढं सगळं असून काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी अवस्था कौशिकी होत आहे. ड्रग्ज प्रकणात तिचा भाऊ युवराज देखील सामील आहे आणि फक्त एवढंच नव्हे तर अनिकाला ड्रग्ज मिळवून देण्यात देखील युवराजचा हात होता. तसंच या टोळीबाबत कामिनी म्हणजेच अनिकाची आजी हिला देखील माहित असून कामिनी अनिकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कौशिकीला युवराजचं खरं सत्य कळेल का ? ड्रग्ज प्रकरणात अनिकाला वाचवताना कामिनी तिच्याच जाळ्य़ात अडकेल हा ? असे अनेक प्रश्र आता प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. मालिकेच्या महासंगमाने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलंय. 10 ते 14 नोव्हेंबरपर्य़ंत असलेल्या या महासंगात सत्याचा विजय होणार का ? गुन्हेगारीतील चेहरे समोर आल्यावर काय होईल, मालिकांचं पुढचं कथानक काय असेल हे आता 14 नोव्हेंबरला कळणार आहे. सध्या मालिका विश्वात तारिणी आणि कमळी मालिकेला पसंती मोठ्या प्रमाणात मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वायरवर कमळी मालिकेचा प्रोमो दाखवण्यात आला होता. जी बाब मराठी मनोरंजन विश्वासाठी अभिमानाची आहे. छोट्या पडद्यावरील कमळी ही पहिली मालिका असेल जिचा प्रोमो आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकला आहे.