नागौर : अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नुकतेच जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकले. आता राजस्थानमध्ये आणखी एक शाही विवाह सोहळा होणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची मुलगी शनैलचं आज लग्न होणार आहे. शनैल (Shanelle Irani) एनआरआय असलेल्या अर्जुन भल्लासोबत (Arjun Bhalla)लग्न करणार आहे. हे लग्न नागौरच्या खींवसर फोर्टमध्ये होणार आहे. हा किल्ला साधारण 500 वर्ष जुना आहे. (Smriti Irani Daughter Wedding)
चुरमा बाटीपासून इटालियन फूडची चंगळ
लग्न राजस्थानमध्ये असल्याने राजस्थानी पदार्थ लग्नाच्या मेन्यूमध्ये ठेवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शनैलच्या लग्नासाठी 30 पेक्षा जास्त पदार्थ बनवण्यात येणार आहेत. सांगरीची भाजी, दाल बाटी चूरमा हे पदार्थ तर आहेतच शिवाय इटालियन पदार्थांचीही चंगळ असणार आहे.
व्हेज आणि नॉन व्हेजचे वेगळे स्टॉल
या लग्नात नॉन व्हेज जेवणाचाही समावेश आहे. स्मृती इराणी पारशी असल्याने साली बोटी, पातरानी मधी, धानसक, अकुरी, कस्टर्ड इत्यादी पदार्थही असतील. यातील काही नॉनव्हेज पदार्थ आहेत तर काही गोड आहेत. लग्नात नागौरची मिठाई बनवण्यासाठी स्थानिक मिठाईवाल्यांनाही बोलावण्यात आले आहे. ही मिठाई पाहुण्यांना दिली जाणार आहे.
हेरिटेज फर्निचरवर पाहुण्यांना जेवण
खींवसर फोर्ट हेरिटेज लूकमध्ये तयार झालं आहे. भिंती आणि फर्निचरमध्ये महागडं लाकूड वापरण्यात आलं आहे. निवडक पाहुण्यांना एका मोठ्या डायनिंग हॉलमध्ये हेरिटेज डायनिंग टेबलवर जेवण दिलं जाणार आहे. इतर लोक गार्डनमध्ये जेवतील.
शनैल ही जुबिन इराणी यांची पहिली पत्नी मोना यांची मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2021मध्ये शनैलचा अर्जुन भल्लाबरोबर साखरपुडा पार पडला. खींवसर फोर्टमध्येच अर्जुनने शनैलला लग्नाची मागणी घातली होती. आता याच ठिकाणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोर्टमध्ये साधारण 71 खोल्या आहेत. तसेच या किल्ल्यामध्ये 4 रेस्टॉरंटही आहेत. याशिवाय 18 टेन्ट या किल्ल्यामध्ये बांधण्यात आले आहेत. तसेच इथे स्विमिंग पूल, जिम, स्पाही उपलब्ध आहे. यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की शाही पद्धतीने स्मृती इराणींच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडणार आहे.