पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे
बर्फ त्वचेसाठी अतिशय उत्तम मानला जातो. बर्फाच्या वापरामुळे त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या दूर होतात आणि चेहरा अतिशय सुंदर दिसतो. यासाठी वाटीमध्ये पाणी घेऊन फ्रिजमध्ये ४ ते ५ तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवावे. त्यानंतर तयार केलेला बर्फ त्वचेवर नियमित फिरवल्यास त्वचा खूप जास्त फ्रेश आणि सुंदर होते. याशिवाय चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. चेहऱ्यावर नियमित बर्फ फिरवल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेच्या पेशी कायमच निरोगी राहतात.
जखम, खरचटणे किंवा आकडी आल्यानंतर सगळ्यात आधी बर्फाचा वापर केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बर्फ अतिशय प्रभावी ठरतो. उन्हातून घरी गेल्यानंतर किंवा चक्कर आल्यावर बर्फाचा वापर केल्यास तात्काळ आराम मिळेल. जखमेच्या अवतीभोवती वाढलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करावा. दुखापतीपासून आराम मिळवण्यासाठी बर्फाचा वापर करावा.
मुक्का मार लागल्यानंतर किंवा एखाद्या भागात अचानक दाह जाणवत असेल तर बर्फाचा वापर करावा. बर्फाच्या वापरामुळे तीव्र वेदनांपासून सुटका मिळते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर हात, पाय, डोळ्याखालील सूज, पाय सुजणे, गुडघे सुजणे इत्यादी शरीराच्या अवयवांना सूज येते. ही सूज कमी करण्यासाठी बर्फाने मसाज करावा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी स्नायूंचा ताण, मसल स्पॅझम, थकवा जाणवू लागतो. अशावेळी गरम थंड थेरपीचा वापर करावा. तसेच सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात कोणत्याही वेळेत ३० मिनिटं व्यायाम, योगासने केल्यास शरीराला आराम मिळेल. शारीरिक हालचाली केल्यानंतर रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच
स्वयंपाक घरातील एखादा पदार्थ जास्त वेळ जसाच्यातसा टिकवून ठेवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. तसेच हातापायांवर वारंवार येणाऱ्या घामापासून सुटका मिळवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. हात आणि पायांवर बर्फ लावल्यास वाताची समस्या कमी होते. पण बर्फाचे खडे नुसतेच खाऊ नये. यामुळे सर्दी, खोकला किंवा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.






