नेमकं काय घडलं?
पीडित महिला आणि आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर हे दोघेही मूळचे परभणी जिल्ह्याचे आहेत. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दोघे आले होते. एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांची ओळख झाली आणि हीच ओळख मैत्री नंतर प्रेमसंबंधात बदलली. पीडित महिलेच्या सांगण्यानुसार, आरोपी २०२४ च्या फेब्रुवारीत तिला अजबनगर परिसरातील एमएच-20 नावाच्या कॅफेत नेले आणि तिथे तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत अत्याचार केला.
खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
या संबंधातून पीडित महिला गर्भवती राहिली. तेव्हा आरोपीने तिचे आणि त्याचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. गोळ्यांमुळे गर्भपात झाल्यानंतर आरोपी पीडितेला पूर्णपणे दूर केले आणि तिला ब्लॉकही केले. त्याचदरम्यान आरोपी PSI पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण झाला.
कुटुंबीयांनी दिली धमकी
पीडित महिलेने आरोपीच्या वडिलांशी आणि बहिणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनीही “तुला जे करायचे ते कर” असे म्हणत धमकावले. अखेर मानसिक छळ, धमक्या आणि झालेल्या अत्याचारामुळे पीडित महिला क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली. ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमएच-20 कॅफेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनाम्यांदरम्यान मिळालेल्या माहितीवरून प्रकरणाची गंभीरता अधिक स्पष्ट झाली.
तपास सुरु
पोलिसांनी सुरुवातीला ही माहिती माध्यमांसमोर येऊ नये म्हणून गोपनीयता पाळली, मात्र नंतर प्रकरण उघड झाले. आता आरोपी PSI आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे. आरोपी PSI विरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचे वडील आणि बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.
Ans: PSI
Ans: क्रांतीचौक
Ans: फोटो






