फोटो सौजन्य- pinterest
आज बुधवार, 19 नोव्हेंबरचा दिवस. आज अमावस्येची सुरुवात होत आहे या अमावस्येची समाप्ती उद्या 20 नोव्हेंबर रोजी दुपारी होणार आहे. चंद्र शुक्रासोबत तूळ राशीत बिग्रह योग तयार करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रापासून दुसऱ्या घरात, सूर्य, मंगळ आणि बुध यांच्यासह, त्रिग्रह योग आणि बुधादित्य योग तयार करत आहेत. त्यासोबतच गुरु, हंस योग आणि अमला योग देखील तयार करत आहे. विशाखा नक्षत्रामुळे सुंदर योग तयार होत आहे. सूर्य अनुराधा नक्षत्रात तर मंगळ ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या सर्व शुभ योगाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणत्या भाग्यशाली राशी आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. भागीदारीच्या कामात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला परदेशातून लाभ मिळू शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये आजचा दिवस फायदेशीर राहील. कोणतेही प्रलंबित प्रकरणे निकाली निघू शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून काही माहिती मिळू शकते. तसेच तुम्हाला चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या धाडसी निर्णयांचे आणि योजनांचे तुम्हाला फायदे मिळतील. तुम्हाला आज एखादी चांगली संधी मिळू शकते त्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. एखादा मित्र किंवा सहकारी देखील तुम्हाला मदत करू शकेल. जर तुम्ही यापूर्वी नोकरीसाठी मुलाखत दिली असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. तुम्हाला भेटवस्तू आणि अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला अनेक प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू शकता, ज्याचा फायदा होईल. मागील गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा होईल. तांत्रिक क्षेत्रातील लोकांना नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. एखादा जुना मित्र किंवा सहकारी तुम्हाला मदतीचा हात देऊ शकेल. तुमच्या कुटुंबाकडूनही तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही कोणतेही अपूर्ण काम पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवल्या जाऊ शकतात. तुम्ही कुटुंबासोबत दिवस आनंदात घालवाल. धनु राशीच्या महिलांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून पाठिंबा आणि लाभ मिळू शकतात. तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकाकडूनही मदत मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कोणतेही प्रलंबित कामे आज पूर्ण होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला सरकारी क्षेत्राशी संबंधित कामामध्ये अपेक्षित फायदा होईल. जर तुम्ही व्यवस्थापन किंवा शिक्षण क्षेत्रात असल्यास तुमचा आजचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवाल. करिअरच्या बाबतीती तुम्हाला एक नवीन संधी मिळू शकते. यावेळी आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. कोणतेही प्रलंबित काम यशस्वी होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






