बिग बॉस मराठी सिझन ५ : बिग बॉस मराठी सध्या प्रचंड चर्चेत आहे, या सिझन टीआरपीचा नवा रेकॉर्ड देखील केला आहे. बिग बॉस मराठी सिझन ५ चे शेवटचे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. मागील आठवड्यामध्ये अरबाज पटेलला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे निक्कीच्या टीममधील फक्त दोन जण आहे शिल्लक राहिले आहेत. निक्की तांबोळीचे अनेक वाद पाहायला मिळाले यामध्ये तिने घरामधील एकही व्यक्तीला वादापासून वंचित ठेवलं नाही. निक्कीने बऱ्याचदा सांगितले आहे की, तिची मैत्री ही अरबाज आणि अभिजीत यांच्यासोबत होती. आता कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर एक नवा प्रोमो आला आहे, यामध्ये अभिजित आणि निक्की यांचं कडाक्याच भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिजीत आणि निक्कीमध्ये यांच्यामध्ये भांडण झालं आहे. यावेळी निक्की म्हणाली की, मीच म्हणाली होती की अभिजीत होईल कॅप्टन, पण याने अंकिताला कॅप्टन बनवलं. यावर अभिजित सावंत म्हणाला की, आमच्यामध्ये लोकशाही आहे तुमच्यामध्ये डिक्टेटरशिप होती. यावर निक्की म्हणते की, चटकावली आहे तू माझी आता, हायहाय झाली आहे मी. यावर अभिजित म्हणाला की, तू गेममधे पण लोकांच्या भावनांचा खेळ केला आहेस. निक्की यावर म्हणाला की, जर तुला मला वाईट दाखवायचं झालं असे आजपासून माझीशी बोलू नको.
बिग बॉस मराठीचा फिनाले हा फक्त दोन आठवड्यांवर आहे. या दमदार खेळामध्ये स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रेक्षकांनीही या सिझनला आणि बिग बॉस मराठी सिझन ५ च्या नव्या होस्टला प्रेम दिल. आता बिग बॉसच्या घरामध्ये पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, सुरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजन पोवार, वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी हे स्पर्धक अजूनही स्पर्धेमध्ये टिकून आहेत.