चित्रपटांसाठी तिच्या धाडसी विषयांच्या निवडीसह नुश्रत भरुच्चा पुढे ‘अकेली’ नावाच्या ड्रामा-थ्रिलरमध्ये दिसणार आहे. एखाद्या व्यक्तीला वाळवंटात अडकल्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या क्षमतेची जाणीव कशी होते हे ‘अकेली’ मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘अकेली’ चे दिग्दर्शन प्रणय मेश्राम ज्यांनी विविध प्रकल्पांसाठी सहयोगी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. अकेलीची निर्मिती दशमी स्टुडिओजचे नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर यांच्यासह विकी सिदाना आणि शशांत शाह यांनी केली आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना, दशमी स्टुडिओजचे निर्माते आणि संस्थापक, श्री नितीन वैद्य म्हणाले, “आम्ही अकेली नुश्रत भरुच्चासोबत सुरू करणार असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा सर्व अडचणींविरुद्ध एकाकी स्त्रीच्या लढाईचे प्रतीक आहे. चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे आणि कथाकार म्हणून प्रणयने प्रत्येक गोष्टीचे इतके छान चित्रण केले आहे की त्याच्या खात्रीमुळे आम्हाला या चित्रपटाची पाठराखण करायची इच्छा निर्माण झाली.