रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या 9 पुतळ्यांचा समावेश असेल. तीन विशेष पाहुणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अभिनेता प्रभास देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रावण दहनाचे हे शुभ कार्य अभिनेता प्रभासच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मैदानात रावण, कुंभकरण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन. तेलुगू अभिनेता प्रभास, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज संध्याकाळी येथे दसरा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
Effigies of Raavan, Kumbh Karan, and Meghnaad installed in Delhi’s Red Fort ground
Telugu actor Prabhas, President Droupadi Murmu and Delhi CM Arvind Kejriwal will attend the #Dussehra celebrations here this evening. pic.twitter.com/MM6JpijJIN
— ANI (@ANI) October 5, 2022
त्याचवेळी अभिनेता प्रभासच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता भगवान रामाची भूमिका साकारत आहे तर चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर अभिनेता सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या या पवित्र शहरात सरयू नदीच्या काठावर या चित्रपटाचा टीझर मोठ्या थाटात लाँच करण्यात आला. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे.