पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या संसद खेल महोत्सवाची आज सांगता झाली. मागील सहा दिवसांपासून पालघरच्या आर्यन हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या खेळ महोत्सवात सहा लाखांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला असून आज राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं . ग्रामीण भागात अशा महोत्सवांची गरज असून यातून नवीन खेळाडू निर्माण होतील असा विश्वास यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. जिल्हा नियोजन समिती मध्ये निधी वाटप करताना पालकमंत्री गणेश नाईक यांच्या निकटवर्तीय दलालानी मर्जीतील ठेकेदारांना हाताशी धरून आर्थिक नियोजन केल्याचा आरोप होतोय.यावर पालकमंत्री यांना विचारले असता, असे काही झाले असेल तर मला सांगा, मी निश्चितच त्याची चौकशी करेन असे म्हटले आहे. ते पालघर मध्ये आयोजित संसद खेल महोत्सव कार्यक्रमादरम्यान आले असता बोलत होते.