Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अजूनही वेळ गेलेली नाही, माफी मागा आणि…” सुदेश म्हशिळकरांच्या प्रतिक्रियेवर प्राची पिसाटची प्रश्नांची रांग

सुदेश म्हशिळकर यांनी भाईंदर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीचा आणि प्राचीच्या फेसबुक चॅटचा फोटो शेअर केला. अशातच, या प्रकरणाला पूर्णविराम मिळेल असं वाटलं होतं. पण, प्राचीनं पुन्हा एकदा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन प्रश्न उ

  • By चेतन बोडके
Updated On: May 30, 2025 | 04:03 PM
"अजूनही वेळ गेलेली नाही, माफी मागा आणि..." सुदेश म्हशिळकरांच्या प्रतिक्रियेवर प्राची पिसाटची प्रश्नांची रांग

"अजूनही वेळ गेलेली नाही, माफी मागा आणि..." सुदेश म्हशिळकरांच्या प्रतिक्रियेवर प्राची पिसाटची प्रश्नांची रांग

Follow Us
Close
Follow Us:

टिव्ही अभिनेत्री प्राची पिसाट प्रकरणावर दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिळकर यांनी प्राचीला पाठवलेले मेसेजेस पाहून अवघी इंडस्ट्री हादरली आहे. प्राचीला फेसबुक चॅटवर दिग्गज अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या अकाउंटवरुन काही आक्षेपार्ह्य मेसेज आले होते. प्राचीनं शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्ट्समध्ये ‘हल्ली खूप सेक्सी दिसायला लागलीयस…’, ‘तुझा नंबर पाठव ना… तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय…’, असे मेसेज होते.

‘हे’ गाणं पाहून रात्रीची झोप उडेल, प्रेक्षकांना हादरवून टाकणारा ‘जारण’चं प्रमोशनल साँग रिलीज

त्यानंतर प्राचीनं म्हटलं होतं की, मला कोणावर कसलेही आरोप करायचे नाहीत. माझं एवढंच म्हणणं आहे की, त्यांनी माझी माफी मागावी आणि विषय संपवावा. पण, सुदेश म्हशीलकरांकडून या प्रकरणावर कसलीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. आता अखेर पाच दिवसांनंतर सुदेश यांनी पोस्ट शेअर करत या प्रकरणावर मौन सोडलं आहे. त्यासोबतच सुदेश यांनी भाईंदर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीचा आणि प्राचीच्या फेसबुक चॅटचा फोटो शेअर केला होता. अशातच, आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळेल असं वाटलं होतं. पण, प्राची पिसाटनं पुन्हा एकदा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

आई-मुलाच्या नात्यात मैत्री शोधणारं ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला…

प्राचीने इन्स्टा स्टोरीवर सुदेश यांना काही प्रश्न विचारले आहेत. तिने प्रश्न विचारले की, “मुद्दा काय तुम्ही बोलता काय ? नक्की माझा नंबर सेव्ह होता की नव्हता? FB अकाऊंटचा एक्सेस होता. अकाऊंट हॅक झाल्यानंतर गप्प का बसलात ? चॅटमध्येच मेसेजच्या खाली मेसेज का नाही केला” तर तिने उत्तर स्माईलीच्या इमोजीतून का दिले यावर तिने खुलासा केला. ती म्हणाली की, “राहिला प्रश्न इमोजीचा तर 50-60 वर्षाच्या माणसाचा अपमान करण्याऐवजी वयाचा मान ठेवून प्रत्येक मुलगी पहिल्यांदा स्माईल इमोजी पाठवून दुर्लक्ष करते आणि आदरपूर्वक विषय संपवते. दुसऱ्यांदा थंब इमोजी पाठवून मी दुर्लक्ष केलं. तरीही मेसेज नाही थांबले. तर तिसऱ्यांदा एकदाच उत्तर देते आणि मॅटर संपवते. मीही तेच केलं. अजूनही वेळ गेलेली नाही. माफी मागा आणि विषय संपवा..”

शेअर केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये सुदेश म्हशिळकर म्हणतात,

खरंतर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मिडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.

1) “हा मेसेज खरंच मीच केला का?”
तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? — याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे — त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप”
मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे — ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं असं दिसेल. जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं. पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अश्याप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.

3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?”
माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.

4) “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?”
मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही ह्याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो — कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.

5) “प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?”
माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.

6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?”
‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे — ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात, आणि माझ्या पत्नीच्या हातचं जेवण प्रेमाने खातात — आपण जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा तू सुद्धा तिच्या हातचं जेवलीयस. या सगळ्या गोष्टींबद्दल कुणाला काही तपासायचं असेल, कुणाला काही विचारायचं असेल — तर माझी अजिबात हरकत नाही.

प्रतिष्ठा ही काचेसारखी असते. पारदर्शक, पण नाजूक. कोणीतरी एक दगड फेकतो… आणि आरसा मोडतो. आज तो क्षण मी गाठलाय… आणि तो शांतपणे पाहतोय. वैयक्तिक पातळीवर एवढंच सांगावंसं वाटतं की, जर हे सर्व केवळ बदनामीसाठी केलं जात असेल, तर ते नक्कीच खेदजनकआहे. मी हा विषय इथे संपवत आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांचे मनःपूर्वक आभार.

Web Title: Prachi pisat reply on sudesh mhashilkar clarification actress demand an apology share full fb chat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
1

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
2

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
3

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
4

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.