Avdhoot Gupte Sakhi Majhi Aai Song Released
प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि निर्माता अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावनिक अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या अल्बममधील दुसरे गाणे ‘सखी माझी आई’ नुकतेच प्रदर्शित झाले असून सध्या हे गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. ‘सखी माझी आई’ हे गाणे अवधूत गुप्ते यांनी स्वतः लिहिले असून या गाण्याला त्यांचाच आवाज व संगीत लाभले आहे.
‘सखी माझी आई’ गाण्यामध्ये आई- मुलाच्या नात्यातील मैत्र शोधण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे हे गाणे अंतर्मनाला स्पर्श करते. या गाण्याचे संगीत संयोजन अनुराज गोडबोले यांनी केले आहे. याआधी प्रदर्शित झालेले ‘सोप्पं नव्हं माय’ हे पहिले गाणेही प्रेक्षकांच्या मनाला भिडले असून, ‘आई’ या विषयावर आधारित चार गाण्यांचा हा अल्बम दर आठवड्याला एक नवीन गाणे घेऊन येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘आई’ या अल्बममधील गीतांचे लेखन समीर सामंत, प्रशांत मडपुवार आणि अवधूत गुप्ते यांनी केले आहे.
परेश रावल यांच्या ‘Hera Pheri 3’ सोडण्याबाबत जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया, दिला एक खास सल्ला
या गाण्याविषयी अवधूत गुप्ते म्हणतात, “‘सखी माझी आई’ हे गाणे मी माझ्या आईला अर्पण करतो. आई ही फक्त जन्मदात्री नसून ती आपल्या आयुष्याची खरी सखी असते. हे गाणे तिच्या त्या सोबतीपणाला समर्पित आहे. मी स्वतः हे गाणे लिहिले, संगीतबद्ध केले आणि गायल्यामुळे माझ्या मनातले तिच्याबद्दलचे प्रेम अगदी शब्दशः उतरवता आले आहेत.”