"अजूनही वेळ गेलेली नाही, माफी मागा आणि..." सुदेश म्हशिळकरांच्या प्रतिक्रियेवर प्राची पिसाटची प्रश्नांची रांग
सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनेत्री प्राची पिसाट कमालीची चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिळकर यांनी प्राचीला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अश्लिल मेसेज केला होता. अभिनेत्रीनं थेट आलेल्या मेसेजचे स्क्रिनशॉर्ट शेअर केल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत खळबळ माजली. तसेच, दिग्गज अभिनेता असं करुच शकत नाही, त्याचं अकाउंट बहुदा हॅक झालं असावं, असा मेसेज प्राचीला अनेकांनी केला होता. त्यानंतर प्राचीनं सायबर क्राईम अधिकाऱ्यांना अभिनेत्याचं अकाउंट खरंच हॅक झालेलं का? यासंदर्भात तपास करायला सांगितलेला. त्यानंतर आता सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
“फुल्ल बॅटिंग चालू…”; सुदेश म्हशिळकरनंतर प्रसिद्ध संगीतकाराचा प्राची पिसाटला विचित्र मेसेज
शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये प्राची पिसाटने खुलासा केला आहे की, “मी माझ्या बाजूने सायबर क्राईम अधिकाऱ्यांना विनंती करुन सुदेश यांचं अकाऊंट खरोखरंच हॅक झालंय का ? हे मी आधीच कन्फर्म केलं आहे. त्यावेळी मला सायबर क्राईम टीमने सांगितलं की, एप्रिल पासून त्यांचं अकाउंट हॅक झालं नव्हतं. गेले 5 दिवस ते गप्प आहेत आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी ते कोणतीच प्रतिक्रिया देत नसतील तर मीडियामध्ये जे काही छापून येतंय, त्यासाठी माझी जबाबदारी नाही. मी फक्त त्यांनी मला पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यावर माझी प्रतिक्रिया टाईप करून माझ्या पर्सनल इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता.”
जिवलग मैत्रिणीने दिलेली साडी आणि माया, Cannes 2025 मध्ये छाया कदमचा जलवा
“मी कोणावर आरोप केलेले नाहीत. मला हा विषय संपवायचा होता म्हणून मी स्पष्टपणे लिहिलं होतं की, जर कमेंट्स येत असतील तर हे सिद्ध करा की त्याचं अकाउंट हॅक झालं होतं, किंवा माफीनामा द्या.” अशी पोस्ट अभिनेत्रीने लिहिलीये. शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्राचीने महिलांच्या हक्कांबद्दल आपलं ठाम मत मांडलंय. ती म्हणालीये की, “मी योग्य वेळी माझ्या हक्कासाठी उभी राहिले. फक्त मुलगी आहे म्हणून माझ्यावर दोष टाकणं योग्य नाही. कोणतीही मुलगी जर स्पष्टपणे आणि ठामपणे स्वतःसाठी उभी राहत असेल तर तिला दोष देणं किंवा तिची शरम काढणं चुकीचं आहे. कृपया लक्षात ठेवा आज किंवा भविष्यात मीडिया जे काही प्रसिद्ध करेल त्यासाठी मी अजिबात जबाबदार नाही.”
Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy
Emiway Bantai च्या जीवाला धोका; रॅपरला मिळाली जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित प्रकरण?
दरम्यान, अभिनेत्री प्राची पिसाटने ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिळकर यांनी तिला पाठवलेल्या फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह्य मेसेजेसचा स्क्रिनशॉर्ट तिने शेअर केले होते. एका ज्येष्ठ अभिनेत्याने केलेले हे विचित्र मेसेजेस पाहून संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली. चाहत्यांसह अनेक मराठी अभिनेत्रींनी आणि पत्रकारांनीही तिला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी प्राचीच्या विरोधातही तिला मेसेजेस केले आहेत. इतकंच नाही तर, सुदेश यांचं कदाचित अकाउंट हॅक झालं असेल, असाही तिला काहींनी मेसेज केला. त्यानंतर प्राचीनं अकाऊंट हॅक झालेलं नसून याआधीही त्यांनी असे मेसेज केलेत याचाही पुरावा सर्वांसमोर ठेवला. एवढ्या गंभीर प्रकरणानंतर अद्याप अभिनेते सुदेश म्हशिळकर यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ना त्यांनी प्राचीची माफी मागितली. त्यामुळे त्यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याच्या चर्चांना उधाण आलं.