(फोटो सौजन्य - Instagram)
रॅपर एमीवे बंटायला नुकतीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एमीवे बंटाय हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. या रॅपरचे खरे नाव मुहम्मद बिलाल शेख आहे आणि तो २९ वर्षांचा आहे. एमीवे बंटायने ‘कुडी’, ‘गली का कुट्टा’, ‘रिंग रिंग’, ‘गिरफ्तार’ आणि ‘जमैका टू इंडिया’ सारख्या रॅपसाठी जगभर प्रसिद्धी मिळवली आहे. आता इतकी लोकप्रियता आणि प्रेम मिळवल्यानंतर, रॅपर एमीवे बंटाय यांच्या जीवाला धोका आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.
‘अॅनिमल’ साठी ४० लाख तर, Spirit साठी घेतले एवढे कोटी रुपये; तृप्ती डिमरीच्या फी मध्ये ९०% वाढ
रॅपर एमीवे बंटायच्या जीवाला धोका
आता अशी बातमी समोर आली आहे की रॅपर एमीवे बंटायला त्याच्या रेकॉर्ड्सच्या नावाने नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. असे सांगितले जात आहे की रॅपरला धमकी मिळताच त्याने त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. २७ मे रोजी सकाळी, रॅपर एमीवे बंटायला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत नवी मुंबईतील एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बातमीने त्याच्या चाहत्यांच्या मनात चिंता निर्माण होत आहे.
सिद्धू मूसेवालाचा मारेकरी एमीवे बंटायला देत आहे धमकी?
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त एमीवे बंटायने ‘ट्रिब्युट टू सिद्धू मूसेवाल’ हे गाणे रिलीज केले आहे. हे गाणे सिद्धू मूसेवालाला समर्पित करण्याच्या एक दिवस आधी, २५ मे रोजी, एमीवे बंटायला १ कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली आहे. रॅपरला केवळ १ कोटी रुपये देण्यास सांगितले गेले नाही तर त्याला मेसेजद्वारे जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाली आहे. रॅपरच्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे चाहते चिंतेत आहे.
दीपिका कक्करला स्टेज 2 लिव्हर कॅन्सर झाल्याचे निदान, भावनिक पोस्टद्वारे चाहत्यांना केली खास विनंती!
रॅपर मिळाली जीवे मारण्याची धमकी
या प्रकरणात महत्वाची बाब अशी आहे की धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी गोल्डी ब्रार म्हटले आहे. धमकी देताना त्याने रोहित गोदाराचे नावही घेतले आहे. हे दोन्ही गुंड बिश्नोईचे जवळचे आहेत. लॉरेन्स बिश्नोईने गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारीही घेतली होती. आता कथितपणे या लोकांनी एमीवे बंटायला संदेश पाठवला आहे की गायकाकडे २४ तास आहेत. जर त्याने एक कोटी रुपये दिले नाहीत तर ते त्याला मारून टाकतील अशी धमकी दिली आहे.