फाेटो सौजन्य - pinterest
मिर्जापूर ही अशी वेब सिरीज आहे ज्या सिरीजने ओटीटीवर स्वत:ची एक वेगळी हवा तयार केली होती. जबरदस्त अॅक्शनने भरलेली सिरीज मिर्जापूरने प्रेक्षकांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर तर नक्कीच बुक केले होते. गेल्या दोन सीजनमध्ये मिर्जापूरने ओटीटीवर अख्ख मार्केट जाम केले होते. अगदी लहान मुलांनाही मिर्जापूर काय आहे, हे बरोबर माहिती होते. मिर्जापूरमधील एक-एक डायलॉग इतके व्हायरल झाले होते की फक्त भारतच नव्हे तर दक्षिण आशियातील बच्चा-बच्चा ते जाणून होता. ती हवा, तो कहर पुन्हा करण्यासाठी मिर्जापूरची टीम पुन्हा एकदा सज्ज आहे. सीजन २ च्या भरघोस यशानंतर मिर्जापूर गॅंग घेऊन येत आहे मिर्जापूरचा तिसरा सीजन, म्हणजे आता ओटीटीवर तोच राडा ते पण त्याच एनर्जीसह पुन्हा पाहायला मिळणार का, हा प्रश्न प्रत्येक मिर्जापूर फॅनच्या मनात आहे. मिर्जापूर सीजन ३ ची बातमी येताच प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मिर्जापूर सीजन ३, शुक्रवारी दिनांक ५ जुलै २०२४ ला रीलीज होणार आहे.
मिर्जापूर सी़जन ३ बद्दल अनेक अंदाज प्रेक्षकांकडून लावले जात आहेत. पण सीजन २ चा क्लायमॅक्स पाहता सीजन ३ चा अंदाज लावणे सोपे होऊन जाते. ‘मिर्झापूर सीझन 3’ तिथून सुरू होईल जिथे सीजन २ संपला होता. एकंदरीत मुन्ना भैय्याचा खून आणि कालेन भैय्याची शरदसोबतची भागीदारी याची पुढची कहाणी दाखवण्यात येणार आहे. मिर्झापूर २ चा शेवट अनेक प्रश्न निर्माण करतो. शरदने कालीनला का वाचवलं? तो युद्धात का उतरला नाही? त्याने गुड्डूला असेच का सोडले? आणि मुख्य म्हणजे मुन्नाच्या हत्येचा बदला कालीन भैया कसा घेणार? या प्रश्नांच्या उत्तरांचे क्लूज ‘मिर्झापूर २’ मध्ये दडलेले आहेत. आता गुड्डू गादीवर दावा करत असल्याने त्याची भविष्यातील उद्दिष्टे काय असतील हे पाहणे बाकी आहे. कारण मिर्झापूरमध्ये विनाकारण कोणीही प्रवेश करत नाही.
‘सीझन 3’ मध्ये एकूण १० एपीसोड असणार आहेत, ज्यामध्ये मुख्य कलाकार असणार तर आहेतच, पण त्याचबरोबर नवीन कलाकार कोण असतील याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.