सर्वच लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. भाज्यांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. पण आरोग्यासाठी भाज्या खाणे अतिशय गुणकारी आहे. रोजच्या आहारात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते. बऱ्याचदा लहान मुलांची उंची लवकर वाढत नाही. अशावेळी मुलांना वेगवेगळे सप्लिमेंट्स पिण्यास दिला जातात. उंची केवळ अनुवांशिक घटकांवर अवलंबून नसून मुलांच्या संतुलित आहारावर आणि पोषणावर अवलंबून असते. त्यामुळे मुलांना आहारात भाज्यांचे सेवन केल्यास मुलांच्या शरीराला पोषण मिळेल आणि उंची वाढण्यास मदत होईल.लहान मुलांना रोजच्या आहारात या भाज्या खाण्यास द्याव्यात. (फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा 'या' भाज्यांचे सेवन
पालक पनीर, पालक पराठा इत्यादी पालकपासून बनवलेल्या पदार्थांचे आहारात किंवा नाश्त्यात सेवन करावे. पालकमध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे अ आणि क मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पालकच्या भाजीचे सेवन करावे.
गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि विटामिन ए मोठ्या प्रमाणावर आढळून येते. गाजर केवळ डोळ्यांसाठीच नाहीतर संपूर्ण आरोग्यासाठीच प्रभावी ठरते. यामुळे वाढीच्या संप्रेरकांची निर्मिती होते.
हिरवे बीन्स आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतात. यामध्ये फायबर आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पुलाव किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवताना बीन्सचा वापर केला जातो.
सलगम शरीरातील वाढीच्या संप्रेरकांना सक्रिय करण्यास मदत करतात. हे एक कंदमूळ आहे. यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे हाडांची गुणवत्ता सुधारते आणि हाडे मजबूत होतात.
ब्रोकोलीमध्ये विटामिन सी, कॅल्शियम आणि लोह मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे लहान मुलांना आहारात ब्रोकोली सूप किंवा ब्रोकोलीपासून बनवलेले इतर पदार्थ खाण्यास द्यावेत.