
धनश्री वर्माचे आक्रिती नेगीवर भयानक आरोप (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
या घटनेनंतर आक्रिती नेगीचे चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत तर काही वापरकर्त्यांना हे प्रकरण गुंतागुंतीचे वाटत आहे. अलिकडच्याच एका भागात, आकृतीने एकट्याने गेम खेळण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धकांमधील तणाव वाढला. यामुळे तिच्यामध्ये आणि धनश्री वर्मामध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर आकृती वेगळी झाली आणि ती तिच्या कुटुंबाची आठवण येऊन भावनिक झाली आणि कागदाच्या तुकड्यावर त्यांचे चित्र रेखाटत होती आणि तिथूनच या सगळ्याची सुरूवात झालेली दिसली.
स्पर्धकांनी आकृतीला बाहेर काढण्याची केली मागणी
आकृती कागदावर कुटुंबाचे रेखाटन करत असताना, अर्जुन बिजलानी, अरबाज पटेल, मनीषा राणी आणि धनश्री यांनी तिच्यावर काळी जादू करण्याचा आरोप करत वाद निर्माण केला. गोंधळानंतरही, अरबाज पटेल तिच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहिला आणि दावा करत होता की ती विचित्र वागत आहे. धनश्रीने तिला खूप भीती वाटत असल्याचे उत्तर दिले, तर मनीषा राणीने आकृती नेगीला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली.
चाहत्यांनी दिला पाठिंबा
या संपूर्ण घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. आकृती नेगीचे चाहते इतर स्पर्धकांवर आपला राग काढत आहेत. चाहते म्हणतात की शोमधील उर्वरित लोक तिच्या प्रामाणिकपणा आणि शांत स्वभावामुळे आकृतीला लक्ष्य करत आहेत. अनेकांनी आकृतीचे कौतुक केले आणि म्हटले की अशा वाईट आरोपांनंतरही ती शांत राहिली. सगळ्या स्तरावर आकृतीचे कौतुक होत आहे.
कोण आहे आकृती नेगी?
आकृती नेगीचा जन्म २००२ मध्ये लखनऊ येथे झाला. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. लखनऊमध्ये शिक्षण घेत असताना, आकृतीने अभ्यासेतर गोष्टींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तिने युट्यूबर आणि इंस्टाग्राम मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. आकृती नेगीचे आतापर्यंत इन्स्टाग्रामवर १.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. २०२३ मध्ये, तिने “रोडीज १९: कर्मा या कांड” मध्ये भाग घेतला. त्यानंतर, ऑगस्ट २०२४ मध्ये, ती “स्प्लिट्सव्हिला एक्स५” मध्ये दिसली आणि विजेती ठरली.
‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा
पहा व्हिडिओ