धनश्री वर्माने केला स्वतःबाबत खुलासा, घटस्फोटाबाबतही बोलली (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अश्नीर ग्रोव्हरचा पहिला रियालिटी शो ‘राईज अँड फॉल’ सध्या चर्चेत आहे. शो सुरू होऊन फक्त ३ दिवस झाले आहेत आणि चाहत्यांना त्याची संकल्पना खूप आवडली आहे. या शोमध्ये अनेक स्टार्सना घेण्यात आले आहे. डान्सर आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा देखील शोमध्ये आली आहे. चाहत्यांना तिची खेळण्याची शैली खूप आवडली आहे.
शोच्या प्रोमोमध्ये, ती तिच्या आणि युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाबद्दल चर्चा करताना चाहत्यांना दाखविण्यात आले आहे. यासोबतच धनश्री तिला इंडस्ट्रीमध्ये कसे काम मिळत आहे याबद्दल एक विधानदेखील करताना दिसून येत आहे. युझवेंद्र जे वागला त्याबाबत तिला अत्यंत दुःख आहे हे तिने याआधीदेखील एका पॉडकास्टमध्ये बोलून दाखवले आहे. याशिवाय तिला आपल्या स्वतःच्या प्रतिभेमुळे काम मिळत असल्याचे तिने अभिमानाने सांगितले आहे.
शोमध्ये अहाना कुमारशी वाद घालताना धनश्री वर्मा तिच्या कारकिर्दीवर एक मुद्दा मांडते. तिने सांगितले की सर्वजण माझ्या विरोधात आहेत, तरीही मी काम करत आहे आणि इथे उभी आहे. धनश्री वर्मा म्हणते, “मला ही इंडस्ट्री खूप आवडते, कारण जेव्हा सर्वजण माझ्या विरोधात असतात तेव्हा काही लोक मला पाठिंबा देत असतात. ते मला कामाची ऑफर देत असतात आणि मला काम मिळत असते. धनश्री पुढे म्हणाली की मला माझ्या प्रतिभेच्या आधारावर इथे काम मिळत आहे”.
Exclusive: ‘मालिकेचे श्रेय लेखकालाच’, महाराष्ट्राचा लाडका ‘जीवा’ विवेक सांगळेचे स्पष्ट मत
यापूर्वी धनश्री वर्माने तिचा एक्स पती युजवेंद्र चहल याबाबतदेखील यावेळी खुलासा केला आहे. धनश्रीच्या म्हणण्याप्रमाणे, युझवेंद्रने सर्वांसमोर माझा अपमान केला आहे. तिने असा दावाही केला होता की जर माझी इच्छा असती किंवा माझ्यावर तसे संस्कार असते तर मी त्याला सर्वांसमोर अपमानित करू शकले असते. मी एक मुलगी आहे आणि सर्व रहस्य उघड करू शकले असते, परंतु मी तसे केले नाही. युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटावर धनश्री म्हणाली की तो माझा पती होता आणि मी त्याचा आदर करते.
लोक धनश्री वर्माच्या या गोष्टींचे कौतुक करत आहेत. अनेक जण आता या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत. काही जणांनी खुलेआम धनश्रीचे कौतुक केले आहे तर काहीजण तिला नेहमीप्रमाणे ट्रोल करत आहेत. मात्र आपण जे काही काम करत आहोत ते केवळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर असल्याचे तिने ठामपणे या शो मध्ये मांडले आहे आणि घटस्फोटानंतर धनश्री अधिक चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येत असल्याचेही काही जणांनी म्हटले आहे. तर धनश्रीचा खेळही अनेकांना आवडत असल्याचे दिसून येत आहे.