(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘शार्क टँक इंडिया’ या टीव्ही शोमधून बाहेर पडल्यानंतर अनेक वर्षांनी, उद्योगपती अश्नीर ग्रोव्हर पुन्हा एकदा एका नवीन रिॲलिटी शो घेऊन परतत आहेत. अश्नीर लवकरच एमएक्स प्लेअरची अनस्क्रिप्टेड मालिका ‘राईज अँड फॉल’ होस्ट करणार आहेत. ‘शार्क टँक इंडिया’चा चौथा सीझननंतर आता अश्नीर ग्रोव्हर ‘राईज अँड फॉल’ हा रिॲलिटी शो घेऊन येत आहेत. या शोमध्ये १६ सेलिब्रिटी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये अर्जुन बिजलानी, धनश्री वर्मा, कुब्रा सैत आणि किकू शारदा यांसारख्या नावाचा समावेश आहे.
‘राईज अँड फॉल’ नवा प्रोमो
तसेच, नुकताच अमेझॉन प्लेअरने ‘राईज अँड फॉल’ चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अश्नीर ग्रोव्हर होस्ट करताना दिसले आहे. यामध्ये अर्जुन बिजलानी, धनश्री वर्मा, कुब्रा सैत आणि किकू शारदा यांची पहिली झलक प्रेक्षकांना दिसली आहे. या शो मध्ये मध्यम वर्गीय आणि श्रीमंत लोक यांच्यामध्ये मोठी टक्कर होताना दिसणार आहे. हा शो पाहताना नक्कीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे.
‘राईज अँड फॉल’ या शोच्या निर्मात्यांनी प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अश्नीर ग्रोव्हरने शोच्या संकल्पनेबद्दल सांगताना दिसत आहेत. त्यांनी खुलासा केला की यात १६ सेलिब्रिटी सहभागी होतील आणि त्यांना ४२ दिवसांसाठी एका घरात बंदिस्त केले जाईल. घर दोन भागात विभागले जाणार आहे. संपूर्ण जगावर राज्य करणारे श्रीमंत आणि शक्तिशाली लोक वरच्या बाजूला राहतील आणि गरीब लोक तळाशी राहणार आहेत. या दोघांमधील टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मनोज बाजपेयीच्या ‘Inspector Zende’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
घराघरात पोहचले होते अश्नीर
तसेच, शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या सीझनपासून अश्नीर ग्रोव्हर प्रत्येक घराघरात पोहचले आणि प्रसिद्ध झाले. त्यांच्या एका ओळी आणि सरळ शब्दात पिचर्सना उत्तर देण्याची सवय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. शो दरम्यान, ते अनेक पिचर्सना फटकारतानाही दिसला. तसेच, या सीझननंतर त्यांना टीव्ही शोमधून बाहेर काढण्यात आले, कारण मे २०२३ मध्ये अश्नीर ग्रोव्हर अडचणीत आले. आणि आता ते पुन्हा ‘राईज अँड फॉल’ या नवीन शोसह परतले आहेत.