'ऑपरेशन सिंदूर'वर मराठी सेलिब्रिटींच्या पोस्ट; सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आनंद...
जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यामध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ने घेतली होती. या २६ जणांमध्ये, दोन विदेशी, दोन स्थानिक आणि २२ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर अखेर दिले आहे. हे सडेतोड उत्तर दिल्याच्या नंतर कोट्यवधी भारतीयांच्या मनात आणि प्राण गमावलेल्या २६ निरपराध पर्यटकांच्या नातेवाईकांचा आज उर भरून आला आहे. त्या निरपराध पर्यटकांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना संपूर्ण भारतीयांची आहे. दरम्यान, या हल्ल्यावर आता भारतीय सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक मराठी सेलिब्रिटी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
‘मी लपून-लपून थकलो…’ ओझेम्पिक औषध घेतल्याच्या अफवेवर करण जोहरने सोडले मौन!
६ आणि ७ एप्रिलच्या मध्यरात्री उशिरा भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केले आहे. या एअर स्ट्राईकमध्ये, भारतीय लष्कराने पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मिरातील असलेले दहशतवाद्यांचे तळं उद्ध्वस्त केलेली आहेत. यामध्ये एकूण ९ दहशतवादी तळ नष्ट केली आहेत. भारतीय लष्कराने हा एअर स्ट्राईक मध्यरात्री १: ३०च्या सुमारास केला. आता या हल्ल्यावर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये, हेमंत ढोमे, क्रांती रेडकर, आरोह वेलणकर, रेश्मा शिंदे, रितेश देशमुख आणि मेघा धाडे सारख्या अशा अनेक सेलिब्रिटींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला.
दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, Operation Sindoor नंतर कंगना रणौत काय म्हणाली?
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने ‘ऑपरेशन सिंदूर’चा बॅनर शेअर करत “जय हिंद! भारत मातेचा विजय असो!” अशी प्रतिक्रिया दिलीये. त्यानंतर अभिनेत्री क्रांती रेडकरनेही ‘ऑपरेशन सिंदूर’चा बॅनर शेअर करत “भारत माता की जय… भारतीय लष्कर सैन्याने आज मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी, पायाभूत सुविधांवर हल्ला करणाऱ्या ठिकाणांवर भारतीय लष्करांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले. जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले आणि निर्देशित केले गेले, ते ठिकाण नष्ट करण्यात आले.” तर, बिग बॉस फेम अभिनेता आरोह वेलणकरनेही ‘ऑपरेशन सिंदूर’चा बॅनर शेअर केलेला आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदेनेही ‘ऑपरेशन सिंदूर’चा बॅनर शेअर करत कॅप्शन लिहिलेय की, “जय हिंद, भारतीय लष्कर सैन्याने पाक दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला.” अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखनेही एक्स पोस्ट शेअर केली. “जय हिंद की सेना… भारत की माता की जय!!!!”अशी त्याने कॅप्शन दिली आहे. आणि पुढे #OpreationSindoor या हॅशटॅगचा वापर केला आहे. मेघा धाडेनेही हल्ल्याविषयी पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता माळीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, “परित्राणाय साधनां विनाशाय च दुष्कृत्याम् | धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे || ” गायक सलील कुलकर्णी यांनी देखील ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी एक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. ते म्हणतात, “जय हिंद, वंदे मातरम् भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरच्या भागात ‘ऑपरेशन सिंदूर’ करत ९ दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कर सैन्य म्हणते ‘न्याय मिळाला…’ ”
“भारतीय लष्कराने पाकिस्तानामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले, पाकव्याप्त काश्मिरमध्ये, बॉम्बहल्ला केला.”, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री श्रुती मराठेने दिली आहे. भारतीय सैन्याचा अभिमान आहे, अभिनेता समीर परांजपेने अशी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री सोनाली खरे हिने ‘ऑपरेशन सिंदूर’चा बॅनर शेअर करत “जय हिंद” असं कॅप्शन देत इन्स्टा स्टोरी शेअर केलीये. भगरे गुरुजींची लेक अनघा भगरे म्हणते, “२ दिवसांपूर्वी माझ्या वडिलांनी युद्धजन्य परिस्थिती येईल, असं भाकित वर्तवलं होतं. तेच भाकित आता दोन दिवसांनी खरं ठरलं. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. ” ३६ तासात युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, परंतु पाकिस्तानची अवस्था बिकट असून भारताला ग्रहमान अनुकूल असल्याचा अंदाज ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी वर्तवला होता. अभिनेत्री सुरुची अडारकर, अभिनेत्री ऋतुजा देशमुख आणि अभिनेत्री सानिया चौधरी हिनेही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.