Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समिधा बनली उल्का, अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत करणार स्क्रीन शेअर

मनोरंजन विश्वातील अभ्यासू अभिनेत्री म्हणजे समिधा गुरु. अनेक कलाकृतींमधून आपला अभिनयाचे नाणं खणखणीत वाजवणारी ही अभिनेत्री आता नव्या भूमिकेसह  रसिकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 22, 2025 | 02:42 PM
समिधा बनली उल्का, अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत करणार स्क्रीन शेअर

समिधा बनली उल्का, अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत करणार स्क्रीन शेअर

Follow Us
Close
Follow Us:

मनोरंजन विश्वातील अभ्यासू अभिनेत्री म्हणजे समिधा गुरु. अनेक कलाकृतींमधून आपला अभिनयाचे नाणं खणखणीत वाजवणारी ही अभिनेत्री आता नव्या भूमिकेसह  रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘भूमिका’ या नवीन नाटकाच्या माध्यमातून अभिनेत्री समिधा गुरु उल्का या एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. जिगिषा अष्टविनायक निर्मित ‘भूमिका’ नाटकाचा शुभारंभ २८ मार्चला होणार आहे.

‘बबन’ फेम अभिनेत्री प्रांजली कंझारकरचे टॉलिवूड इंडस्ट्रीत डेब्यू, आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी घेतेय विशेष मेहनत

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना समिधा सांगते की, “अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही आव्हानात्मक भूमिका आहे. या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे कंगोरे साकारण्यात आव्हान असले तरी या व्यक्तिरेखेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळताहेत. उल्का ही गृहिणीअसली तरी तिला तिची स्वतंत्र मत आहेत. तिची स्वतःची अशी स्वतंत्र भूमिका आहे. उल्का आपली भूमिका आणि मतं आपल्या नवऱ्यासमोर व इतरांसमोर कशाप्रकारे मांडते? हे दाखवताना एका प्रवृत्तीचा आरसा या नाटकातून आपल्यामोर येईल. महिला प्रेक्षकांना तर ही उल्का म्हणजे आपणच आहोत की काय असं ही जाणवू शकतं इतकी ती व्यक्तिरेखा कालसुसंगत आहे.”

 

‘वल्लरी’ आणि ‘पिंगा गर्ल्स’ना ‘अशोक मा.मा.’ देणार मदतीचा हात, मालिकेला मिळणार वेगळं वळण

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते सचिन खेडेकर यांचे अमूल्य मार्गदर्शन इतर सहकलाकारांची उत्तम साथ या सगळ्यांमुळे मला वेगळ्या स्तरावर नेणारी भूमिका साकारणं शक्य झाल्याचं समिधा आवर्जून सांगते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेते सचिन खेडेकर या दोन मातब्बर कलावंतांसोबत काम करण्याचा आणि शिकण्याचा आनंद अभिनेत्री म्हणून मला समृद्ध करणारा आहे ‘भूमिका’ या नाटकाच्या निमित्ताने एक सशक्त कलाकृती नाट्यरसिकांना पहायला मिळेल हे निश्चित.

मोहम्मद सिराजसोबतच्या डेटिंगवर माहिरा शर्माची पहिली प्रतिक्रिया! रिलेशनशिप स्टेटसचा स्वतः केला खुलासा

‘भूमिका’ नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अशोक पत्की यांचे आहे. प्रकाशयोजना अमोघ फडके तर रंगभूषेची जबाबदारी उलेश खंदारे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा  प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. सूत्रधार प्रणित बोडके तर निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद  पद्माकर आहेत.

Web Title: Sachin khedekar and samidha guru starrer marathi drama play bhumika will be inaugurated on 28 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
1

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत
2

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
3

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”
4

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.