Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हसवत, हसवत विचार करायला लावणारा ‘म्हणजे वाघाचे पंजे’चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रंजक ट्विस्टमधून उलगडणार आकर्षक कहाणी…

द्विधा मनस्थितीत अडकलेली एक नवी कोरी कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा नवाकोरा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 22, 2025 | 07:26 PM
हसवत, हसवत विचार करायला लावणारा ‘म्हणजे वाघाचे पंजे’चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रंजक ट्विस्टमधून उलगडणार आकर्षक कहाणी…

हसवत, हसवत विचार करायला लावणारा ‘म्हणजे वाघाचे पंजे’चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रंजक ट्विस्टमधून उलगडणार आकर्षक कहाणी…

Follow Us
Follow Us:

लग्न, लग्नासाठी घरच्यांची धडपड आणि मुलींचा आलेल्या स्थळाला नकार या सगळ्या गोष्टी अनेकदा कानावर पडतात. मात्र कुटुंबाची जबाबदारी ही या क्षणी तितकीच महत्त्वाची असते तर मुलांची मनही यावेळी महत्त्वाची असतात. या द्विधा मनस्थितीत अडकलेली एक नवी कोरी कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होत आहे. हो, ‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा नवाकोरा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाच्या समोर आलेल्या ट्रेलरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे.

अवधूत गुप्तेचं भावस्पर्शी अल्बम रिलीज, ‘सोप्पं नव्हं माय’ गाणं ऐकलंत का ?

हास्याची झालर घेऊन आशयघन कथेला हाताळत समोर आलेला चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना कोड्यात पाडत आहे. संजय नार्वेकर, दिपाली सय्यद या कलाकारांचा अभिनय ट्रेलरमध्ये बरच काही सांगून जात आहे. तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये समोर आलेली नवी अभिनेत्री तमन्ना बांदेकर तिच्या सुंदरतेने, अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकतेय. अर्थात चित्रपटात तमन्नावर लग्नाबाबत आलेल संकट ती कशी हाताळणार, आईच्या म्हणण्यानुसार ती लग्न करणार की स्वतःच्या मनाजोगा जोडीदार निवडणार हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी ट्रेलरमध्ये याची पाहायला मिळालेली झलक चित्रपटाची उत्सुकता ताणतेय.

‘TRISHOOLIN CINEVISION’ प्रस्तुत ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री तमन्ना बांदेकर प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातील हे पदार्पण आहे. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून पदार्पण असून सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

स्वामींची पहिल्यांदाच ‘भस्मारती’ होणार, निस्सीम भक्तीचे नवे गूढ उलगडणार; मालिकेला येणार नवीन वळण

‘TRISHOOLIN CINEVISION’, निर्मला रमेश बांदेकर निर्मित हा चित्रपट कौशिक मेहता, डॉ. सुनीता संतोष पोटे, डॉ. संतोष संपतराव पोटे प्रस्तुत म्हणजे वाघाचे पंजे’ हा चित्रपट असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक स्वरूप सावंत याने सांभाळली असून दिग्दर्शनाबरोबर स्वरूप सावंत याने चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारीही पेलवली आहे. तर संगीत हर्षवर्धन वावरे आणि त्रिनीती ब्रोस यांचे असून लेखक म्हणून संजय नवगिरे यांनी बाजू सांभाळली आहे. आणि हा संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. चित्रपटाच्या आशयघन कथेबरोबर चित्रपटाच्या तगड्या स्टारकास्टने लक्ष वेधून घेतलं आहे. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या नवाकोरा आणि रोमँटिक आशयघन चित्रपट लवकरच म्हणजे ३० मे रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Sanjay narvekar deepali sayyad starrer mhanje waghache panje marathi movie trailer released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 07:26 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry
  • marathi movie

संबंधित बातम्या

Gen-Z कमिटमेंटला घाबरत नाही! सिद्धार्थ मेननने नातेसंबंधांवर मांडला वेगळा दृष्टिकोन
1

Gen-Z कमिटमेंटला घाबरत नाही! सिद्धार्थ मेननने नातेसंबंधांवर मांडला वेगळा दृष्टिकोन

माळीण दुर्घटनेची हृदयद्रावक कहाणी मोठ्या पडद्यावर; ‘एक होतं माळीण’चा दमदार टीझर रिलीज
2

माळीण दुर्घटनेची हृदयद्रावक कहाणी मोठ्या पडद्यावर; ‘एक होतं माळीण’चा दमदार टीझर रिलीज

‘तुला पाहता’ ट्रेलर रिलीज! मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात उलगडणार दोन पिढ्यांतील प्रेमाची अनोखी कहाणी
3

‘तुला पाहता’ ट्रेलर रिलीज! मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात उलगडणार दोन पिढ्यांतील प्रेमाची अनोखी कहाणी

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य
4

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.