Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींनी दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

संकर्षण कऱ्हाडेने दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली यावेळी त्याला गडकरींनी खास भेटवस्तू देखील दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 16, 2025 | 08:19 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडे आपल्या अभिनयासोबतच साहित्यिक विचारांसाठीही ओळखला जातो. नुकतीच त्याने दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि ही भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

संकर्षणने आपल्या इन्स्टाग्रामवर गडकरींसोबतचा फोटो शेअर करत या भेटीचा अनुभव शेअर केला आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयांवर गप्पा झाल्या. नितीन गडकरींनी संकर्षणला खास भेटवस्तूही दिली आहे. संकर्षणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भेटीत गडकरींनी त्याला स्वतः लिहिलेलं पुस्तक स्वाक्षरीसह भेटवस्तू म्हणून दिलं. संकर्षणच्या म्हणण्यानुसार, त्यांना मिळालेल्या अर्ध्या तासाच्या वेळेत गप्पा अगदी घर, घरातली माणसं, लिखाण, नागपूर, दिल्ली आणि खाणं यापर्यंत पोहोचल्या.

संकर्षण कऱ्हाडे पोस्टमध्ये म्हणाला,, “आज दिल्ली मध्ये नितीन गडकरी साहेबांची भेट झाली… त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक, स्वाक्षरी करुन भेट म्हणून दिलं. त्यांच्या भेटीसाठी मिळालेल्या अर्ध्या तासाच्या वेळेत गप्पांचे विषय हे घर, घरातली माणसं, लिखाण, नागपूर, दिल्ली आणि “खाणं…” असे चौफेर होते. वाह! मज्जाच आली… थँक्यू सर! ही खास भेट घडवून आणल्याबद्दल आमचे मित्र अंकित यांचे आभार!”

कृती सेननने इतिहास घडवला, वर्ल्ड हेल्थ समिटमध्ये बोलणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली!

नितीन गडकरी यांनी संकर्षणला India Aspires हे त्यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं.विशेष म्हणजे, या पुस्तकाच्या पहिल्या पानावर नितीन गडकरी यांची स्वतःची स्वाक्षरी असून, संकर्षणने त्या पानाचा फोटो सुद्धा आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Pankaj Dheer Death: ‘’जाणाऱ्याला जाऊ द्या…’’ पंकज धीर यांच्या निधनाआधी निकितिनची भावनिक पोस्ट झाली व्हायरल

‘India Aspires’ हे पुस्तक नितीन गडकरी यांचं दृष्टिकोन, नेतृत्वशैली आणि भारताच्या विकासावरील विचारांचं संकलन आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातील अनुभवातून भारताच्या प्रगतीसाठी काय काय शक्यता आहेत, यावर भाष्य केलं आहे.

Web Title: Sankarshan karhade met union minister nitin gadkari in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • delhi
  • marathi actor
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण
1

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
2

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश
3

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
4

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.