(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पंकज धीर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. बी. आर. चोप्रांच्या ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी साकारलेली कर्णाची भूमिका त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून देणारी ठरली होती. त्यांच्या निधनाचे कारण कॅन्सर असल्याचे सांगितले जात आहे. काही काळापूर्वी अशी माहिती समोर आली होती की ते कॅन्सरवर मात करून बरे झाले आहेत, मात्र नंतर पुन्हा त्यांना या गंभीर आजाराने ग्रासल्याचे कळाले.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा निकितिन धीरची एक इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमधून अनेकांना असं वाटतंय की निकितिनला वडिलांच्या जाण्याचा अंदाज आधीच होता.
त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती यात निकितिनने लिहिलं,”जे येणार आहे, त्याला येऊ द्या. जे राहणार आहे, त्याला राहू द्या. जे जाणार आहे, त्याला जाऊ द्या.”यासोबतच पुढे त्यांनी लिहिलं आहे,”मी एक शिवभक्त आहे. ‘शिव नमस्कार’ बोला आणि पुढे चला. तेच सर्वांचं भलं करतील.” शेवटी त्यांने लिहिलं आहे. “हे सगळं करायला खूप अवघड असतं.”
पंकज धीर यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा निकितिन धीर याची एक भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ही पोस्ट पंकज धीर यांच्या निधनाच्या अगोदर काही तास आधी शेअर करण्यात आली होती, त्यामुळे अनेक जण या पोस्टला त्यांच्या निधनाशी जोडत आहेत.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांना प्रत्येक भागासाठी मिळाले एवढेच मानधन, जाणून व्हाल चकीत
अभिनेत्याने बराच काळ कर्करोगाला दिली झुंज
पौराणिक टीव्ही शोमधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या पंकज धीर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावरही दुःख ओढवले आहे. हा अभिनेता बराच काळ कर्करोगाशी झुंज देत होता. तरीही, ते त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आजाराची माहिती देत राहिले. ते शेवटचे Zee5 च्या पॉयझन वेब सिरीजमध्ये दिसले होते. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेत त्याने बॅरिस्टर डी’कोस्टाची भूमिका उत्तम प्रकारे साकारली होती. परंतु, तेव्हापासून पंकज धीर प्रसिद्धीपासून दूर आहेत.