shilpa tulaskar and swapnil joshi
झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर आली आहे. (Tu Tevha Tashi Serial Update) सौरभ आपल्या मनातील भावना अनामिकासमोर व्यक्त करणार की नाही हे आगामी भागामध्ये कळणार आहे. कॉलेजचं रियुनियन सौरभ आणि अनामिकाच्या आयुष्यासाठी निर्णायक ठरू शकेल का हे आता प्रेक्षकांना पुढील भागात पहायला मिळणार आहे. या रियुनियनची सध्या जोरदार तयारी चालू असल्याचं प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत आहे.
आता ‘ती’ला कोण सांगणार की लकी कोण आणि अनलकी कोण?
सोम ते शनि, रात्री ८:०० वा. #TuTevhaTashi #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/7O8beUQuzO— Zee Marathi (@zeemarathi) May 30, 2022
सौरभ अनामिकाला अजुन काही क्लू देतो. अनामिका काही त्या मुलीला ओळखू शकत नाही. सौरभ या सगळ्याचा आनंद घेत आहे. प्रेक्षक मालिकेत आता पुढे पाहू शकतील की रियुनियनचा दिवस येतो. सगळे मित्र अनेक वर्षांनंतर भेटतात. प्रत्येक मुलीमध्ये अनामिका तिला शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिला यश मिळत नाही.
[read_also content=”तरुणीकडे तिकीट नव्हते, तिकीट तपासनीस एसी कोचमध्ये घेऊन गेला; तीन पुरुषांनी केला बलात्कार https://www.navarashtra.com/world/gang-rape-in-moving-train-in-pakistan-the-girl-did-not-have-a-ticket-took-the-ticket-checker-to-the-ac-coach-raped-by-three-men-287360/”]
दुसरीकडे वल्ली या रियुनियनला पोहोचते आणि सौरभ अनामिकासमोर त्याच्या मनातील गोष्ट बोलू नये यासाठी तिचे प्रयत्न सुरू होतात. ती सौरभला गुंगीचं औषध देते. त्या औषधाचा परिणाम काही काळ राहतो पण सौरभ अनामिकासमोर त्याच्या मनातील भावना बोलून दाखवतो. ती मुलगी अनामिकाच आहे हे अनामिकाला कळणार आहे पण अनामिका सौरभच्या भावनांचा स्वीकार करेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
झी मराठी वाहिनीवर २० मार्चपासून रात्री ८ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारतेय.