Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: प्राप्ती रेडकरने फटाके फोडणं थांबवलं तर महिमा म्हात्रे काढतेय भाऊबीजेची आठवण

सावली मालिकेतून घराघरात पोहचलेली प्राप्ती रेडकर आणि तुला जपणार आहेमधील मीरा अर्थात महिला म्हात्रे यांनी आपल्या दिवाळीच्या आठवणी खास प्रेक्षकांसाठी शेअर केल्या आहेत. काय म्हणाल्या दोन्ही अभिनेत्री जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 18, 2025 | 11:01 AM
प्राप्ती आणि महिमाच्या दिवाळीच्या आठवणी

प्राप्ती आणि महिमाच्या दिवाळीच्या आठवणी

Follow Us
Close
Follow Us:
  • “निसर्गासाठी माझं छोटं पाऊल!” सांगतेय प्राप्ती 
  • “भाऊबीजेच्या दिवशी आम्ही नेहमी एकत्र येतो!” – महिमा म्हात्रे
  • अभिनेत्रींच्या दिवाळीच्या आठवणी 

सण म्हणजे आपलेपणाचा, प्रेमाचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंददायी अनुभव. दिवाळी ही अशीच एक संधी आहे जी आपल्याला आप्तेष्ट, सखेसोबती आणि भावंडांबरोबर जुन्या आठवणी जागवण्याची संधी देते. कलाकार देखील त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना करत आहेत. अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि महिमा म्हात्रे यांनी त्यांच्या दिवाळीच्या आठवणी आणि दिवाळी साजरी करण्याच्या खास पद्धती सांगितल्या.

सावली फेम प्राप्ती काय सांगतेय 

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती रेडकर म्हणाली, “जर सुट्टी मिळाली तर मी माझ्या आई- वडिलांबरोबर दिवाळी साजरी करेन. माझ्या लहानपणीची एक खास आठवण म्हणजे माझ्या नानीच्या घरी आम्हा लहान मुलांमध्ये दरवर्षी पहाटे ४ वाजता कोण पहिलं फटाका वाजवतो याची स्पर्धा असायची. आई-वडिलांनी आणलेले नवीन कपडे घालून मरीन लाइन्सला जाणं, हे फार जिव्हाळ्याचं आहे माझ्यासाठी. गेल्या ५ वर्षांपासून मी फटाके फोडणं थांबवलं आहे कारण वायूप्रदूषण खूप होतं. माझ्या छोट्याशा कृतीने निसर्ग वाचत असेल तर का नाही? मात्र दिवाळी साजरी  करण्याचे विविध मार्ग आहेत. मी कुटुंबासोबत फराळ करणे, नातेवाईकांना भेटणे आणि फराळ बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे हा माझ्यासाठी दिवाळीचा एक खास भाग आहे.” प्राप्ती पुढे म्हणाली “माझं व्यक्तिमत्व फुलबाजी आणि चकरी सारखं आहे. फुलबाजीसारखं ‘तडतड’ करत मी सेटवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असते.  

‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत

महिमा म्हात्रेने शेअर केल्या आठवणी

‘तुला जपणार आहे’ मालिकेतील मीराची भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे म्हणाली, “दिवाळी आम्ही खूप पारंपरिक पद्धतीने साजरी करतो. नरक चतुर्दशीला लवकर उठून उटणं लावणं, दिवे लावणं, कुटुंबासोबत फराळ करणं, देवदर्शन आणि नातेवाईकांना भेटणं हे सगळं एकत्रित करत दिवाळीची मजा वाढते. या वर्षी मी खूप उत्सुक आहे कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी, कारण ‘तुला जपणार आहे’ च्या शूटमुळे कुटुंबाला भेटायला वेळ मिळत नाही. पण दिवाळीच्या दिवशी मी घरीच असणार आहे. दरवर्षी आम्हा भावंडांची एक परंपरा आहे की आम्ही भाऊबीजेच्या दिवशी कुठेही असलो तरी एकत्र येतो. माझा भाऊ ध्रुव माझ्या खूप जवळचा आहे. ध्रुव आणि माझी तन्वी ताई दोघांनीही मला खूप साथ दिली आहे, मार्गदर्शन, कौतुक केलं आहे आणि मला माझ्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत केली.” 

दिवाळी म्हणजे एकत्र येण्याचा आणि आपुलकीच्या बंधांनी नाती घट्ट करण्याचा सण आहे. कलाकारांच्या या आठवणी आपल्या साऱ्यांनाही आपल्या बालपणात घेऊन जातात. नात्यांची ही दिवाळी अशीच प्रेमाने उजळत राहो.

दोन्ही मालिका वेगळ्या वळणावर 

सध्या सावली आणि पारू या दोन्ही मालिकांचा महासंगम असून सावली आणि सारंग एका मोठ्या संकटात अडकले आहेत आणि सावली यावेळी सारंगला कशी साथ देणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे ‘तुला जपणार आहे’ मालिकेत मीराने अंबिकाची सुटका केली असली तरीही तिच्या स्वतःवर अनेक संकट येत आहेत. मंजिरीचा चेहरा कधी तिच्यासमोर येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळी स्पेशल एपिसोड्सची चाहते उत्सुकतेने वाटत पाहत आहेत. 

मंजिरीचा डाव पुन्हा फसणार; सत्याचा विजय होणार, ‘तुला जपणार आहे’ मालिकेला नवं वळण

Web Title: Savalyachi janu savali fame prapti redkar and tula japnar ahe fame mahima mhatre remembering diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

‘ठरलं तर मग’ च्या चाहत्यांसाठी दिवाळीची खास भेट, पूर्णा आजी परत येणार!
1

‘ठरलं तर मग’ च्या चाहत्यांसाठी दिवाळीची खास भेट, पूर्णा आजी परत येणार!

‘ठरलं तर मग’ मालिकेत नवीन पूर्णा आजीची एन्ट्री, ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मोठा बदल
2

‘ठरलं तर मग’ मालिकेत नवीन पूर्णा आजीची एन्ट्री, ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मोठा बदल

“फराळातला एक पदार्थ तरी आईसोबत बनवायचाच!”, विजया बाबरची दिवाळीची गोड परंपरा
3

“फराळातला एक पदार्थ तरी आईसोबत बनवायचाच!”, विजया बाबरची दिवाळीची गोड परंपरा

‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत
4

‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.