Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाशिवरात्रीला कलर्स मराठीवर शिवतत्त्वाची दिव्य अनुभूती; प्रकटणार बारा ज्योतिर्लिंगे

यंदाच्या महाशिवरात्रीला कलर्स मराठीवर शिवस्वरूपाचे भव्य दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. आई तुळजाभवानी आणि जय जय स्वामी समर्थचे विशेष भाग टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 12, 2026 | 11:51 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • महाशिवरात्रीला कलर्स मराठीवर धमाका
  • महाशिवरात्रीला घडणार शिवतत्त्वाची दिव्य अनुभूती
  • महाशिवरात्रीला प्रकटणार बारा ज्योतिर्लिंगे
 

मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘न भूतो न भविष्यति’ अशी शिवतत्त्वाची दिव्य अनुभूती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. महाशिवरात्रीच्या मंगल पर्वानिमित्त कलर्स मराठी वाहिनी आपल्या भक्तिप्रेमी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे दोन भव्य आणि अलौकिक विशेष भाग ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ मध्ये पाहायला मिळणार आहे. अध्यात्म, भक्ती, शिवतेज आणि ब्रह्मांड दर्शन यांचा अद्वितीय संगम असलेले हे महाएपिसोड्स यंदाची महाशिवरात्र अधिक संस्मरणीय ठरवणार आहेत.

महादेव- पार्वतीचा आशीर्वाद आणि सखीची साथ, विशाल- अक्षयाने बांधली प्रेमाची लग्नगाठ

महाशिवरात्र म्हणजे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि ऊर्जायुक्त रात्र आहे. या दिवशी शिवतत्त्व अधिक जागृत होते, अशी श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा विशेष भाग येत्या रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. या भागात ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या गूढ आणि गहन आध्यात्मिक सिद्धांताची उकल करण्यात येणार आहे. महादेवांचे विराट, भव्य आणि ब्रह्मांडरूप प्रेक्षकांना अनुभवता येणार असून, त्यामागील तत्त्वज्ञानही प्रभावी दृश्यांमधून साकारले जाणार आहे. देवी यमाई आणि आई तुळजाभवानी यांच्या कथेतून उलगडणारे मर्मबंध आणि त्याचा शिवतत्त्वाशी असलेला संबंध या भागात अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडला जाणार आहे. भक्ती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधत हा महाएपिसोड प्रेक्षकांना एक वेगळीच दिव्य अनुभूती देणार आहे.

त्यानंतर सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:३० वाजता ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा २६ मिनिटांचा विशेष भाग रंगणार आहे. स्वामी चरित्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा भाऊसाहेब जहागीरदार यांच्या जीवनातील एका निर्णायक प्रसंगाच्या माध्यमातून शिवतत्त्वाची प्रचिती प्रेक्षकांना मिळणार आहे. शिवतांडव स्तोत्राच्या गजरात स्वामी समर्थांच्या हृदयातून एकापाठोपाठ एक बारा ज्योतिर्लिंग प्रकट होण्याचा अलौकिक आणि रोमांचकारी प्रसंग या भागात पाहायला मिळणार आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे आध्यात्मिक महत्त्व, त्यामागील संकेत आणि शिवस्वरूपाची अनुभूती हे सर्व दृश्य माध्यमातून अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने साकारले जाणार आहे.

‘नाही मिळाले कोणतेच पैसे..’ राजपाल यादव यांच्या भावाचा मोठा दावा; सेलिब्रिटींच्या ‘सिम्पथी कार्ड’वर साधला निशाणा

मराठी टेलिव्हिजनवर इतक्या मोठ्या प्रमाणावर शिवस्वरूपाचे दर्शन आणि त्यामागील आध्यात्मिक संकेतांची उकल यापूर्वी कधीच झाली नव्हती. अत्याधुनिक तंत्रज्ञान, भव्य सेट्स, प्रभावी पार्श्वसंगीत आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हे दोन्ही विशेष भाग भक्तीमय वातावरण निर्माण करतील. शिवभक्तांसाठी ही केवळ मालिका नसून, एक आध्यात्मिक प्रवास ठरणार आहे. या महाशिवरात्रीला आपल्या कुटुंबासह भक्ती, श्रद्धा आणि दिव्यता अनुभवण्यासाठी ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ यांचे विशेष भाग पाहावा लागणार आहे.

Web Title: First shivtattva experience mahashivratri special episodes aai tuljabhavani jai jai swami samarth colors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Colours Marathi
  • entertainment
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.