बॉलीवूडचा बादशाह शाहरुख नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. शाहरुख खानचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये त्याला पसंत करतात. सध्या भारतामध्ये आयपीएल आयपीएलबद्दल क्रिकेट चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. आतापर्यंत त्याचे सामने वेगवेगळ्या शहरांमध्ये झाले आहेत. कोलकाता नाईट राइडर्सचा पुढील सामना हा त्यांच्या होम ग्राऊन्डवर होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खानही या सामन्यासाठी कोलकाता येथे पोहोचला आहे.
आजच्या आयपीएल २०२४ च्या सामन्यासाठी शाहरुख खान काल रात्री कोलकाता येथे पोहोचला. या सामन्यासाठी किंग खान त्याची मुले सुहाना खान आणि अबराम खानसोबत कोलकाता येथे गेला आहे. कोलकाता विमानतळावरून शाहरुखचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर चाहते वेडे झाले आहेत. प्रत्यक्षात समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खानसाठी विमानतळावर कडक सुरक्षा दिसत आहे. शाहरुख खान आणि त्याची दोन मुलं सुहाना आणि अबराम यांना पूर्णपणे सुरक्षेने घेरले आहे. यादरम्यान किंग खानने आपल्या मुलाचा हात पकडला आहे. त्याच्या आजूबाजूला एवढी सुरक्षा आहे की शाहरुखला पाहणेही कठीण होत आहे.
SRK’s arrival in Kolkata ahead of tomorrow’s KKR match, adds an extra dose of excitement! His presence always sparks a surge of energy among players and fans alike❤️@iamsrk @KKRiders @KKRUniverse #ShahRukhKhan #KKRvsLSG #KKR #KorboLorboJeetbo #SRK pic.twitter.com/UgOxrAUect
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) April 13, 2024
विमानतळाबाहेर फक्त पोलीस बंदोबस्त दिसत आहे. किंग खान किंवा कोणत्याही सेलिब्रिटीला अशा प्रकारची सुरक्षा देण्यात आली, असे यापूर्वी घडलेले नाही. शाहरुख खानची एवढी सुरक्षा पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर यूजर्सही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.