Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा; ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…

सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो.

  • By चेतन बोडके
Updated On: May 02, 2025 | 03:29 PM
मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा; ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा; ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

Follow Us
Close
Follow Us:

सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो. १६ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

R Madhavan चं NCERT च्या अभ्यासक्रमावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित, हिंदू-बौद्ध धर्मावरही केले भाष्य…

टीझरमध्ये या तिघांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली होती, पण ट्रेलरमध्ये हा प्रवास नेमका कशासाठी सुरू होतो, याचे धागेदोरे उलगडताना दिसत आहे. समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी हे तीन मित्र सिक्कीमकडे निघतात. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतो. जो त्यांच्या मैत्रीत, आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो. पण तो अनुभव नेमका काय आहे? हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. चित्रपटातील सिक्कीमचे अप्रतिम लोकेशन्स आणि दोन पिढ्यांतील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या घरी गोंडस पाहुण्याचे आगमन, नाव ठेवले…

चित्रपटाबद्दल स्नेह पोंक्षे म्हणतो, “आपण सगळेच खरंतर ‘बंजारा’ आहोत. कधीकधी निश्चित स्थळी पोहोचण्याचा नादात आपण प्रवासाचा आनंदच लुटत नाही. आयुष्यात या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात, हेच दाखवण्याचा प्रयत्न ‘बंजारा’मध्ये करण्यात आला आहे. सर्वच वयोगटाला हा चित्रपट जवळचा वाटेल.”

प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणतात, “प्रेक्षकांना जशी चित्रपटाची उत्सुकता आहे, तशीच आम्हालाही आहे. ‘बंजारा’ मध्यमवयीन प्रेक्षकांना आपल्या जुन्या मैत्रीची आठवण करून देईल. तर तरुणाई या सफरीचा आनंद घेत, त्या आठवणी भविष्यात जपण्याचा प्रयत्न करतील. मैत्री आणि आत्मशोध यांची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे.”

प्रसिद्ध गायिकेचा आगीत होरपळून मृत्यू; नव्वदच्या दशकात गाजलं होतं नाव

मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची आहे.

Web Title: Sharad ponkshe bharat jadhav and sunil barve starrer banjara movie trailer out on social media watch trailer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • marathi film
  • marathi movie

संबंधित बातम्या

Tighee Movie: तीन स्त्रिया, एक भावस्पर्शी कथा, पीआयएफएफच्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड
1

Tighee Movie: तीन स्त्रिया, एक भावस्पर्शी कथा, पीआयएफएफच्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
2

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!
3

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!

Movie Collection: बजेट पेक्षा जास्त ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ चित्रपटाची कमाई, चाहत्यांचा मिळाला भावुक प्रतिसाद
4

Movie Collection: बजेट पेक्षा जास्त ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ चित्रपटाची कमाई, चाहत्यांचा मिळाला भावुक प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.