Famous Singer Jill Sobule Dies In House Fire Breathes Her Last At The Age Of 66
हॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. संगीत जगतात आपल्या जादुई आवाजाने सर्वांवर भुरळ टाकणारी सुप्रसिद्ध गायिका आणि गीतकार जिल सोबुले (Famous Singer Jill Sobule) हिचं निधन झाले आहे. सुप्रसिद्ध गायिकेच्या निधनाच्या वृत्ताने हॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुरूवारी अर्थात १ मे रोजी अभिनेत्रीचं निधन झालं आहे, ती ६६ वर्षांची होती. ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायिका आणि गीतकारांपैकी एक असलेल्या जिलच्या अचानक जाण्याने म्युझिक इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ही पोकळी भरुन निघणारी नाही.
पाकिस्तानी अभिनेत्रीने व्हायरल पोस्टवर सोडले मौन, म्हणाली- ‘मी हे विधान केले नाही…’
जिल नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध हॉलिवूड गायिका असून त्यांना ‘आई किस्ड अ गर्ल’ या गाण्यातून जगभरात विशेष लोकप्रियता मिळाली. ६६ वर्षीय जिल सोबुलेच्या घरात आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. गुरूवारी, १ मे रोजी मिनेसोटा येथील एका घराला लागलेल्या आगीत गायिकेचा मृत्यू झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. शुक्रवारी म्हणजेच २ मे रोजी जिलचा एक गाण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार होती. पण त्याआधीच एक वाईट अपघात घडला ज्यामध्ये त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.
जिल सोबुले यांची मॅनेजर जॉन पोर्टर (John Porter) यांनी मिनेसोटा स्टार ट्रिब्यूनला (Minnesota Star Tribune) या अमेरिकन न्यूजपेपरला दिलेल्या माहितीमध्ये गायिकेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. गायिकेच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जिल शुक्रवारी, २ मे रोजी त्यांच्या गावी डेन्व्हरमध्ये आत्मचरित्रात्मक स्टेज संगीतमय ७ व्या ग्रेडचे प्रदर्शन करण्यासाठी सादरीकरण करणार होत्या. पण त्या आधीच त्यांचे निधन झाल्यामुळे चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातून चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. २०२३ मध्ये ड्रामा डेस्क पुरस्कारासाठी त्या नामांकित झाल्या होत्या.
जिल सोबुले ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायिका आणि गीतकारांपैकी एक आहे. तिने आपल्या दमदार आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिला ‘आय किस्ड अ गर्ल’, ‘क्लुलेस’ आणि ‘सुपरमॉडेल’ या चित्रपटांमधून सर्वाधिक ओळख मिळाली. १९९० मध्ये तिने स्वत:चं ‘थिंग्ज हियर आर डिफरंट’ नावाचं अल्बम साँग रिलीज केला आणि मागे वळून पाहिले नाही. जिल सोबुले तिच्या गायन शैलीसाठी ओळखली जात होती. तिने नेहमीच आपल्या गाण्यामधून महिलांना सक्षम आणि मजबूत व्यक्तिमत्त्वाच्या रूपात चित्रित केले. तिने ९० च्या दशकात ‘आय किस्ड अ गर्ल’ नावाचं गाणं बनवलं, त्यावेळी अशी गाणी क्वचितच बनवली जात असत. १९९० नंतरही त्यांनी अनेक अल्बम रिलीज केले आणि चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांसाठी गाणी तयार केली. २०२३ मध्ये त्यांनी एक नाटकही लिहिले. हे नाटक तिच्या बालपणीवर आधारित होते आणि लोकांना ते खूप आवडले.