Mitali Mayekar And Siddharth Chandekar Homes Welcome To Toy Poodle Bride Dog
मराठी सिनेसृष्टीतले लाडके कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर… दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटोज् आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. या दोघांच्या लग्नाला साधरण ३ वर्ष झाली आहेत. इंडस्ट्रीतल्या ह्या फेवरेट कपलच्या घरात एका गोंडस पाहुण्याचे आगमन झाले आहे. या कपलने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. सिद्धार्थ आणि मितालीने त्यांच्या घरी श्वान आणलं. त्याच्या पिल्लूसोबत फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केलेली आहे.
साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
काही तासांपूर्वीच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर श्वानासोबत फोटो शेअर केलेला आहे. खरंतर, सिद्धार्थ आणि मिताली श्वानप्रेमी आहेत, हे चाहत्यांना ठाऊक आहे. अनेकदा ते त्यांच्या लॅब्राडॉरसोबत (Labrador) फोटोज् शेअर केलेले होते. आता त्या दरम्यानच सिद्धार्थ आणि मितालीने त्यांच्या दुसरं श्वानाचं पिल्लू घेतलंय. त्यांचं श्वानाचं दुसरं पिल्लू टॉय पूडल नावाच्या (Toy Poodle) ब्रिडचं आहे. ज्याचं नाव, पिकू असं आहे. त्यांनी आपल्या दोन्हीही श्वानांसोबत फोटोज् शेअर केलेले आहेत. या शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
सिद्धार्थने लाडक्या श्वानांसोबत फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, “आमच्या पिकूला (Piku) भेटा, कुटुंबातलं नवीन सदस्य…” आणि पुढे #tinypanda #labradorretriever #toypoodle अशा हॅशटॅगचा वापर केलेला आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींकडूनही सिद्धार्थ आणि मितालीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सिद्धार्थ आणि मिताली कायमच एक चर्चेत राहणारं नाव आहे. ते कायमच आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. सिद्धार्थ आणि मितालीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
प्रसिद्ध गायिकेचा आगीत होरपळून मृत्यू; नव्वदच्या दशकात गाजलं होतं नाव
प्रार्थना बेहरे, रवि जाधव, रेशम प्रशांत, वैदेही परशुरामी, रेश्मा शिंदे आणि मेघना जाधव यांसह अनेक सेलिब्रिटींनी सिद्धार्थ आणि मितालीने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.