फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस मराठी सिझन ५ : बिग बॉस मराठी सिझन ५ आता शेवटच्या टप्प्यात आहे, त्यामुळे आता स्पर्धकांसाठी या फिनाले वीकमध्ये बिग बॉस मोठे सेलिब्रेशन करण्याच्या इराद्यात आहे. आता बिग बॉस मराठी सिझन ५ चा फिनाले ६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राने या खेळातील स्पर्धकांना भरभरून प्रेम दिले आहे. आता या खेळामध्ये फक्त ७ स्पर्धक शिल्लक आहेत. यामध्ये मागील आठवड्यामध्ये पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी घराबाहेर पडले आहेत. आता घरामध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, सुरज चव्हाण, वर्षा उसगावकर, जान्हवी किल्लेकर आणि अभिजित सावंत हे सात स्पर्धक शिल्लक आहेत. हे स्पर्धक शिल्लक असताना फिनालेमध्ये सिलेब्रेशन करण्यासाठी शिव ठाकरेने घरामध्ये एंट्री केली आहे.
शेवटच्या आठवड्यामध्ये फिनाले वीकमध्ये अनेक पाहून स्पर्धकांना भेटण्यासाठी आणि त्याचा उत्साह वाढवण्यासाठी येणार आहेत. आता शिव ठाकरे बिग बॉसच्या घरामध्ये कल्ला करण्यासाठी आला आहे. शिव ठाकरे याने घरात येताच बिग बॉसच्या घराला नमस्कार केला आहे आणि त्याचबरोबर बिग बॉसच्या घरांमधील सदस्यांना मानाचा मुजरा देखील केला आहे.
शेवटच्या आठवड्यात स्पेशल गेस्ट म्हणून शिव ठाकरे येणार, बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच सगळ्यांचं grand सेलिब्रेशन रंगणार 😎
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर.#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo pic.twitter.com/KJcPB5Y8tw
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 1, 2024
बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये सध्या फिनालेमध्ये जाण्याची शर्यत सुरु आहे. यामध्ये कोणता खेळाडू फिनालेच्या शर्यतीत जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. प्रेक्षकांच्या नजरेनं पाहिलं तर धनंजय पोवार आणि वर्षा उसगावकर यांच्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. मागील दोन आठवडे होस्ट रितेश देशमुख हा भाऊंच्या धक्क्यावर आला नाही त्यामुळे घरच्यांना त्याच्या कामगिरीबद्दल फार काही फीडबॅक मिळाला नाही. पण रितेश देशमुख हा फिनालेला होस्टिंग करायला येणार आहे. असे बिग बॉसने आधीच स्पस्ट केले आहे.