Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्री महावतार बाबाजींची महती सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटही जाहीर…

एक युगपुरुष एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 11, 2025 | 05:24 PM
श्री महावतार बाबाजींची महती सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटही जाहीर…
Follow Us
Close
Follow Us:

एक युगपुरुष एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा योग म्हणजेच क्रियायोग… या क्रिया योगाचा अवलंब करून अतिशय कमी काळात मानव आपली उत्क्रांती करू शकतो, अध्यात्मिक मार्गाने पुढे जाऊ शकतो, आयुष्याचं कल्याण करू शकतो. या योगाचे प्रणेते श्री महावतार बाबाजी जे हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन धरतीवर संचार करीत आहेत अशा रहस्यमय हिमालयीन योग्याची भेट आपल्याला ‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटात घडणार आहे. १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आणखी दोन आव्हान, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेला नवीन ट्रॅक

भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘फकिरीयत’ या सिनेमाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे. मांजरेकर यांनी आजवर बऱ्याच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ‘फकिरीयत’च्या रूपात त्यांनी प्रथमच हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. गुरूपौर्णिमेच्या पावन दिवसाचा मुहूर्त साधत ‘फकिरीयत’चे नवे कोरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर श्री महावतार बाबाजींसोबत श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, श्री रामकृष्ण परमहंस, श्री लहिरी महाशय या महान संतांचे फोटोही आहेत. पोस्टरच्या एका बाजूला दोन्ही हात जोडून विनम्र भावनेने उभी असलेली अभिनेत्री दिपा परब दिसते.

‘इंद्रायणी’ करणार गुरु माहात्म्य सांगणारे खास कीर्तन, मालिकेत मिळणार भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास

‘फकिरीयत’च्या निमित्ताने दीपाने हिंदी चित्रपटात पुनरागमन केले आहे. पोस्टरच्या दुसऱ्या बाजूला उदय टिकेकर, संदेश जाधव आणि विनीत शर्मा आहेत. ‘गुरू और शिष्य की कहानी’ ही चित्रपटाची टॅगलाईन ‘फकिरीयत’चा मुख्य उद्देश सांगण्यासाठी पुरेशी आहे. श्री महावतार बाबाजींच्या कार्याची महती ‘फकिरीयत’च्या माध्यमातून जगासमोर येणार आहे. ‘फकिरीयत’ हा चित्रपट एक युगपुरुष, महापुरुष, महावतार बाबाजी व त्यांचा क्रियायोग यांची खरी ओळख सांगणारा आहे. दीपाने साकारलेल्या बाबाजींच्या शिष्येच्या माध्यमातून कथा उलगडणार आहे. हा चित्रपट रसिकांना केवळ आध्यात्मिक अनुभूती देणारा नसून, जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान सांगणारा आहे. गुरू-शिष्य परंपरेचा अद्भुत वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा आहे. अध्यात्म आणि भक्ती यांचा सुरेख संगम या चित्रपटात घडविण्यात आला आहे.

गायिका आशा भोसलेंच्या निधनावर मुलगा आनंद यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे वृत्त खोटं…”

चित्रपटाची कथा ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर लिखित पुस्तकांवर आधारित आहे. पटकथालेखन अनिल पवार यांनी केले असून, पवार यांनीच अनुजा जानवलेकर यांच्यासोबत संवादलेखनही केले आहे. ‘फकिरीयत’ या चित्रपटात दीपा परब सोबत विनीत शर्मा, उदय टिकेकर, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनुषा सबनीस आदी कलाकार असून संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. समृद्धी पवार यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना संगीतकार प्रवीण कुंवर यांनी मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल यांच्या आवाजात संगीतसाज चढवला आहे. डिओपी अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे.

Web Title: Shri mahavtaar babaji biography movie poster released on social media released date declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • Bollywood News

संबंधित बातम्या

राधिकाच्या ‘अंधाधुन’, ‘पॅडमॅन’ सारख्या चित्रपटांनी जिंकले मन; जाणून घ्या अभिनेत्रीचा संपूर्ण प्रवास
1

राधिकाच्या ‘अंधाधुन’, ‘पॅडमॅन’ सारख्या चित्रपटांनी जिंकले मन; जाणून घ्या अभिनेत्रीचा संपूर्ण प्रवास

अभिनयानंतर आता जगासमोर आलं आमिर खानचं हिडन टॅलेन्ट, Viral Video पाहून व्हाल चकीत
2

अभिनयानंतर आता जगासमोर आलं आमिर खानचं हिडन टॅलेन्ट, Viral Video पाहून व्हाल चकीत

‘माझ्या धर्मात परवानगी नाही…’, गणपती बाप्पा मोरया न बोलल्यामुळे अली गोनी ट्रोल; स्वतःच दिले स्पष्टीकरण
3

‘माझ्या धर्मात परवानगी नाही…’, गणपती बाप्पा मोरया न बोलल्यामुळे अली गोनी ट्रोल; स्वतःच दिले स्पष्टीकरण

अरिजीत सिंगचा लंडनमधील लाईव्ह कॉन्सर्ट अचानक झाला बंद, कारण जाणून व्हाल चकीत
4

अरिजीत सिंगचा लंडनमधील लाईव्ह कॉन्सर्ट अचानक झाला बंद, कारण जाणून व्हाल चकीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.