Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाकात नथ अन् केसात गजरा…; सावनी रवींद्रने शेअर केला वारीतला खास क्षण; पारंपारिक लूकने वेधले लक्ष

सावनीने आजवर अनेक गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं. आता सावनी विठुरायाच्या वारीत सहभागी झाली असून तिने यावेळी गायनसेवेने साऱ्या वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. वारीचा हा अनुभव सावनीने तिच्या व्लॉगद्वारे शेअर केला

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 05, 2025 | 06:07 PM
नाकात नथ अन् केसात गजरा...; सावनी रवींद्रने शेअर केला वारीतला खास क्षण; पारंपारिक लूकने वेधले लक्ष

नाकात नथ अन् केसात गजरा...; सावनी रवींद्रने शेअर केला वारीतला खास क्षण; पारंपारिक लूकने वेधले लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

वारी या शब्दातच खूप पावित्र्यता आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची आस बाळगून प्रत्येक वारकरी आपल्या परीने त्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. विठुरायाचं बोलावणं आल्याशिवाय ही भेट घडत नाही असं बोललं जात. आणि हो हे खरंय. जिच बालपणचं चिंचवड येथे झालं त्या गायिकेला या वारीचा अनुभव आता घेता आला. हा अनुभव आपल्यासह शेअर केला आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्रने.

फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२५ च्या नामांकनांची यादी जाहीर; ‘पाणी’, ‘फुलवंती’ आणि ‘घरत गणपती’ सह अनेक चित्रपट शर्यतीत

सावनीने आजवर अनेक गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं. आता सावनी विठुरायाच्या वारीत सहभागी झाली असून तिने यावेळी गायनसेवेने साऱ्या वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. वारीचा हा अनुभव सावनीने तिच्या व्लॉगद्वारेही शेअर केला आहे. स्वतः गाडी चालवत ती फलटण येथे गेली आणि तिने हा अनुभव सावनी रविंद्र या तिच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. नाकात नथ, सुंदर साडी, केसात गजरा असा मराठमोळा लूक करत सावनीने यंदाच्या वारीत सफर केले. पहिल्यांदाच अनुभवलेल्या या वारीचा अनुभव तिने यावेळी सांगितला.

“अनाजीपंता, कितीबी आग लाव…” ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर किरण मानेंची पोस्ट

सावनी हा अनुभव शेअर करत म्हणाली, “नमस्कार, आयुष्यात पहिल्यांदा वारीच्या अनुभव फलटण येथे घेतला. अत्यंत विलक्षण असा हा अनुभव होता. आजपर्यंत लहानपणापासून अनेक अभंगरचना, संतरचना मी सादर केल्या आहेत, त्यामध्ये वारीच वर्णन ऐकलं आहे. माझं बालपण पुण्यातील चिंचवड येथे अत्यंत पवित्र ठिकाणी गेलं, जिथे देहू आणि आळंदी सारखी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळे लहानपणापासून वारी दुरून अनुभवली होती, चिंचवडमधून वारीच प्रस्थान होतं त्यामुळे ते अनुभवलं होतं पण कधी वारकरी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली नव्हती. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम असतात, दौरे असतात त्यामुळे असा योग जुळून आला नाही”

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करची मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतली भेट, दोघींमध्ये नेमकं नात काय ?

पुढे ती म्हणाली, “माझी अशी श्रद्धा आहे की, तुमची इच्छा असण्यापेक्षा ज्यावेळी पांडुरंगाचं बोलावणं येतं तेव्हा ती सेवा घडते. असं यंदा माझ्याबरोबर घडलं. धर्म, पंत, जात-भेद, भाषा या कशाचंही बंधन नसता वारकरी म्हणून त्याचा वारीमध्ये समावेश असतो. प्रत्येकाच्या मुखावर हरिनाम असतं. हा अनुभव मी माझ्या मनात आयुष्यभर साठवेन. पहिला अनुभव हा नेहमीच संस्मरणीय असतो तसा तो ठरला. यामध्ये मी खेळ मांडियेला या संत तुकारामांच्या अभंगाचं शुटिंग मला वारीमध्ये करता आलं. मला या शुटिंगदरम्यान कोणतीही अडचण आली नाही. प्रत्येक वारकऱ्याने मला त्यांच्यामधील एक बनवून घेतलं. त्यामुळे हे शूटिंग मी अत्यंत आनंदात पार पाडू शकले याचा खूप आनंद आहे”.

Web Title: Singer savani ravindra attend first time pandharpur wari shared experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • Famous Singer
  • pandharpur
  • pandharpur wari
  • savaniee ravindra

संबंधित बातम्या

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध
1

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध

Sunidhi Chauhan Birthday: वयाच्या चौथ्यावर्षी सुरु केला गाण्याचा प्रवास; कुटुंबासोबत लढून मोडले धर्माचे बंधन
2

Sunidhi Chauhan Birthday: वयाच्या चौथ्यावर्षी सुरु केला गाण्याचा प्रवास; कुटुंबासोबत लढून मोडले धर्माचे बंधन

Suresh Wadkar Birthday: कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर कसे बनले महाराष्ट्राचे लाडके गायक? सुरेश वाडकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी
3

Suresh Wadkar Birthday: कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर कसे बनले महाराष्ट्राचे लाडके गायक? सुरेश वाडकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी

Eknath Shinde : संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
4

Eknath Shinde : संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.