SONALEE KULKARNI DEEPIKA KAKKAR REUNION
‘ससुराल सिमर का’ मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री दीपिका कक्कर हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अभिनेत्री दीपिका कक्करला काही दिवसांपूर्वीच लिव्हरला असलेल्या ट्युमर कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्या आजाराबद्दल कुटुंबीयांना आणि चाहत्यांना कळाल्यानंतर त्यांना मोठा धक्काच बसला होता. आजाराचे निदान झाल्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्रीवर या आजारासंबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या अभिनेत्री उपचार घेत आहे. आता दीपिकाची भेट घेण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पोहोचली आहे, याबद्दलची पोस्ट दीपिकाने शेअर केली आहे.
दीपिकाला भेटण्यासाठी सोनाली तिच्या घरी पोहोचली. यावेळी सोनालीने दीपिकाच्या तब्येतीची विचारपूस केली असून तिच्यासोबत खास फोटोही शेअर केला आहे. आता या दोघी एकमेकांना कशा काय ओळखतात ? दोघींचं नक्की नातं काय ? याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. याचं उत्तर सोनालीने स्वत: इन्स्टा स्टोरीतून दिलंय. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये दीपिकाने सोनाली कुलकर्णीसोबतचा फोटो शेअर केला आहे. “KV1 देहू रोड या शाळेपासून ते आत्तापर्यंत… काही नाती बदलत नाहीत. काळजी, प्रेम, आपुलकी बदलत नाही. आम्ही सारख्या भेटत नसलो तरीदेखील आमच्यातलं नातं तसंच आहे. थँक्यू आणि लव्ह यू सोनाली”, असं कॅप्शन दीपिकाने या पोस्टला दिलं आहे.
sonalee kulkarni meet tv actress deepika kakkar shared photo
इंद्रायणीला होणार विठुरायाचा साक्षात्कार, शकुंतला समोर येणार मोठं विघ्न
दीपिकाने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्या दोघीही एकमेकींना मिठी मारताना दिसत आहेत. दीपिका आणि सोनाली एकाच शाळेत शिकल्या आहेत. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर आणि प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघीही बालपणीच्या मैत्रिणी आहेत. खूप दिवसानंतर या दोघीही मैत्रिणी एकमेकींना भेटल्या आहेत. दरम्यान, शोएब कायमच युट्यूबवरील ब्लॉगच्या माध्यमातून दीपिकाच्या हेल्थबद्दलची माहिती शेअर करत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीही शोएबने त्याच्या पत्नीच्या हेल्थबद्दल माहिती दिली.
हिंदी भाषेच्या मुजोरीवर ‘बिग बॉस’ विजेत्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट; म्हणाला, “हा कोणता माज?”
शोएबने व्हिडिओच्या माध्यमातून दीपिकाच्या तब्येतीबाबत एक नवीन खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, अभिनेत्रीला पुढील आठवड्यात टार्गेटेड थेरेपी घ्यावी लागेल. शेअर केलेल्या एका नवीन ब्लॉगमध्ये, या कपलने तिच्या हेल्थबद्दल संपूर्ण माहिती शेअर केली आहे. शोएब इब्राहिमने सांगितले की, ३ जुलै रोजी दीपिकावर झालेल्या सर्जरीला एक महिना पूर्ण झाला.