बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या बऱ्याच काळापासून लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची सुरुवात द ग्रेट इंडियन कपिल शो पासून सुरु झाली. या शो मध्ये ती लग्न करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसली होती. आता त्याच्या लग्नाशी संबंधित अपडेट समोर आले आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बालला डेट करत आहे, ज्यांच्यासोबत ती अनेकदा पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये दिसत असते. असे बोलले जात आहे की, अभिनेत्री 23 जून रोजी मुंबईत लग्न करणार आहे. यानंतर चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाच्या चर्चेचे उधाण सुरू झाले.
उल्लेखनीय आहे की सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल सोशल मीडियावर फोटो आणि सुंदर कॅप्शनसह आपले प्रेम दाखवत आहेत. दरम्यान, अभिनेत्याने सोनाक्षीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने काही रोमँटिक फोटो देखील शेअर केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खास मित्र आणि कुटुंबाव्यतिरिक्त, हीरामंडीच्या कलाकारांना लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की लग्नाचे आमंत्रण मॅगझिनच्या मुखपृष्ठाप्रमाणे डिझाइन केले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे – ‘अफवा खऱ्या आहेत.’ पाहुण्यांना औपचारिक पोशाख घालून येण्यास सांगितले आहे आणि लग्न मुंबईतील बुस्टन येथे साजरे केले जाणार आहे. मात्र, अभिनेत्रीच्या बाजूने अद्याप कोणतेही माहिती मिळालेली नाही.
[read_also content=”सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला नाही, ‘हिरामंडी’मध्ये ‘हे’ पाकिस्तानी कलाकार होते भन्साळींची फर्स्ट चॅाईस! https://www.navarashtra.com/movies/sanjay-leela-bhansali-want-to-caste-pakistani-actors-faead-khan-mahira-khan-in-heeramandi-nrps-528840.html”]
कामाच्या आघाडीवर, सोनाक्षीने अनेक हिंदी चित्रपट सुपरहिट केले आहेत. तिच्या अभिनयाचे बाहेर प्रचंड चाहते आहेत. नुकत्याच तिने काम केलेल्या हिरामंडी या OTT सिरीजमध्ये तिने बाजी मारू चाहत्यांना घायाळ केले आहे. तसेच ती अक्षय आणि टायगर सोबत ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. असेच नवनवीन प्रोजेक्ट्स ती प्रेक्षकांसाठी घेऊन येईल यात शंकाच नाही.