नेरूळ येथे मनसे नेते अमित ठाकरे यांनी खुले केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक नवी मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा बंदिस्त केल्याने मनसेमध्ये संतापाची लाट आहे. स्मारक सर्वांसाठी खुले ठेवावे, अशी मागणी मनसेने जोरदारपणे पुढे केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहत स्मारक तात्काळ सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची विनंती केली आहे. तसेच नवी मुंबईतील जुन्या शिवसैनिकांनीही या मुद्द्यावर एकत्र यावे, अशी साद मनसेकडून देण्यात आली आहे