Who Is Lakshmi Menon: सुंदरपांडियन’ आणि ‘कुट्टी पुली’ सारख्या हिट चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री लक्ष्मी मेनन (laxmi Menom) एका गंभीर प्रकरणात अडकली आहे. तिच्यावर एका आयटी कर्मचाऱ्याचे अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर ती सध्या बेपत्ता असून, कोची पोलीस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणात एकूण ४ आरोपींपैकी ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, हा गुन्हा फेब्रुवारी महिन्यात दाखल झाला होता. कोचीमधील अलुवा येथील एका रहिवाशाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीनुसार, शहरातील दोन गटांमध्ये वाद सुरू होता. यापैकी एका गटात लक्ष्मी मेनन तिच्या तीन साथीदारांसह (अनीश, मिथुन आणि एक महिला) सामील होती.
🚨 South Actress Lakshmi Menon Under Police Radar
Actress Lakshmi Menon may face police grilling in an IT employee abduction & assault case. Reports suggest she is being questioned regarding her alleged links to the matter.#LakshmiMenon #SouthCinema #BreakingNews #Rashtravaani pic.twitter.com/SsGYsqEHCe— RashtraVaani (@RashtraVaani25) August 27, 2025
तक्रारदाराने सांगितले की, वाद वाढल्यानंतर तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. आरोपींनी त्यांची गाडी थांबवून त्यांना बाहेर काढले आणि त्यांचे अपहरण केले. लक्ष्मी मेनननेही यात सहभाग घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, पोलिसांनी एक व्हिडिओ मिळवला आहे. या व्हिडिओमध्ये लक्ष्मी मेनन एका गाडीला थांबवताना स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमुळे तिच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून ही अभिनेत्री फरार आहे.
केरळमधील कोचीची रहिवासी असलेल्या लक्ष्मी मेननने २०११ साली ‘रघुविंथे स्वांथम रजिया’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. त्यानंतर २०१२ मध्ये ‘सुंदर पांडियन’ या तामिळ चित्रपटातून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. तिने आतापर्यंत १९ हून अधिक मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.