आयुष्मान खुराना (Ayushman Khurana), रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि शेफाली शाह (Shefali Shah) अभिनित जंगली पिक्चर्सचा बहुप्रतिक्षित चित्रपट, ‘डॉक्टर जी’च्या (Doctor G) प्रदर्शनाची तारीख जवळ येते आहे. गमतीशीर आणि अनोख्या पोस्टर्सपासून ते मनोरंजक ट्रेलरपर्यंत या चित्रपटाने दर्शकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
‘डॉक्टर जी’या चित्रपटात विनोद आणि सामाजिक संदेशासह डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राचे वर्णन असल्याने, अलीकडेच जंगली पिक्चर्सने ५० हून अधिक डॉक्टरांसाठी विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते.
[read_also content=”अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचा जल्लोष https://www.navarashtra.com/photos/amitabh-bachchan-birthday-celebration-at-jalsa-nrsr-335190.html”]
जंगली पिक्चर्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या चित्रपटाला सर्व डॉक्टरांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद आणि प्रचंड प्रेम पाहायला मिळेल. स्क्रीनिंगदरम्यान, कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीचे आणि चित्रपटात असलेल्या संवेदनशील कथनाचे कौतुक करत डॉक्टरांनी धम्माल केली.
उपस्थित डॉक्टरांपैकी एकाने सांगितले की, “त्याने त्याच्या आयुष्यातील निवासी दिवस पुन्हा जगले पण मजेदार मार्गाने”. आयुष्मान खुरानासोबत चित्रपटाबद्दल आपले विचार शेअर करताना, एक पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणाला, “तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या निवासी अनुभवाचे चित्रण केले आहे तेच आमच्या बाबतीतही घडले आहे”.
या चित्रपटाला वैद्यकीय क्षेत्रातून तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला शीबा चड्ढा आणि शेफाली शाहचा ट्रेलर आणि डायलॉग प्रोमोसह, या शुक्रवारी चित्रपटाच्या रिलीजसाठी दर्शक सज्ज झाले आहेत.
अनुभूती कश्यपद्वारा दिग्दर्शित आणि सुमित सक्सेना, सौरभ भारत, विशाल वाघ आणि अनुभूती कश्यपद्वारा लिखित ‘डॉक्टर जी’ १४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जंगली पिक्चर्सच्या आगामी स्लेटमध्ये ‘वो लड़की है कहां?’, ‘डोसा किंग’, ‘उलज’ आणि ‘क्लिक शंकर’ या नावांचा समावेश आहे.






