T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! (Photo Credit- X)
आपल्या चुलत भावाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शुभमन गिलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्याने गडद मरून रंगाचा पारंपारिक कुर्ता परिधान केला होता. बॉलिवूडच्या काही गाजलेल्या गाण्यांवर शुभमनने जबरदस्त डान्स केला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तो वधूसोबतही डान्स करताना दिसत असून उपस्थितांनी त्याच्या डान्सला दाद दिली. मैदानावर शांत आणि संयमी वाटणारा गिल खासगी कार्यक्रमात किती मनमोकळा असतो, याची प्रचिती या व्हिडिओवरून येत आहे.
When Shubman Gill hits the dance floor 🕺 pic.twitter.com/cWk4pqlErP — Shubman Gill Fc (@ShubmanGill7fc) February 16, 2026
भारतीय निवड समितीने टी-२० विश्वचषक २०२६ साठी शुभमन गिलचा संघात समावेश केलेला नाही. खराब फॉर्म किंवा संघ संतुलनामुळे त्याला या मोठ्या जागतिक स्पर्धेतून बाहेर बसावे लागले आहे. मात्र, गिलने खचून न जाता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नुकत्याच झालेल्या सौराष्ट्र विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात तो पंजाबकडून खेळताना दिसला. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने ३ सामन्यात २ अर्धशतके झळकावून आपण फॉर्मात असल्याचे संकेत दिले आहेत.
शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरार अहमदच्या वादग्रस्त हावभावावर रोहित शर्माची प्रतिक्रिया, पहा Video
शुभमन गिल आता थेट आयपीएल २०२६ च्या हंगामात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. विश्वचषक संपल्यानंतर लगेचच आयपीएलला सुरुवात होणार आहे. शुभमन गुजरात टायटन्स (GT) संघाचे नेतृत्व करत असून फ्रँचायझीने त्याला मेगा लिलावापूर्वीच रिटेन (राखून ठेवणे) केले आहे. भारतीय टी-२० संघात पुन्हा एकदा आपले स्थान पक्के करण्यासाठी गिलसाठी आगामी आयपीएल हंगाम अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
आयपीएल २०२५ मध्ये शुभमन गिलने अत्यंत स्फोटक फलंदाजी केली होती. त्याने १५ सामन्यांमध्ये ५०.०० च्या सरासरीने आणि १५५.८७ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने ६५० धावा कुटल्या होत्या. यामध्ये त्याने ६ अर्धशतकेही लगावली होती. हाच फॉर्म कायम राखून पुन्हा एकदा राष्ट्रीय संघाचे दरवाजे ठोठावण्याचा गिलचा मानस आहे.
शुभमन गिलला पुन्हा T20 संघात खेळण्याची संधी मिळेल का? बीसीसीआयच्या मान्यतेने, अशक्य गोष्ट होईल शक्य!






