Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत स्थगित

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 18 जानेवारीपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. त्यामुळे 18 जानेवारीच्या सुनावणीवर निवडणुकीची (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal) पुढील प्रक्रिया होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

  • By साधना
Updated On: Jan 12, 2023 | 05:11 PM
akhil bhartiya marathi chitrapat mahamandal

akhil bhartiya marathi chitrapat mahamandal

Follow Us
Follow Us:

मुंबई: मराठी चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट निर्मात्यांच्या सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु होती. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 18 जानेवारीपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. त्यामुळे 18 जानेवारीच्या सुनावणीवर निवडणुकीची (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal) पुढील प्रक्रिया होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याबाबतचे आदेशही न्यायालयाने दिले असल्याची माहिती ॲड. युवराज नरवणकर व महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.

[read_also content=”‘घर बंदूक बिरयानी’ ‘या’ तारखेला होणार रिलीज, नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता https://www.navarashtra.com/movies/announcement-of-ghar-banduk-biryani-release-date-nrsr-361228.html”]

चित्रपट महामंडळाकडे गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सभासदांनी ‘अ’ वर्ग सभासदत्वाचे निकष पूर्ण केले. त्यांना त्याबाबतची ओळखपत्रेही महामंडळाने दिली आहेत. त्यासाठीचे शुल्कही संबंधित सभासदांनी भरले आहे. मात्र असे असताना अंतिम मतदारयादीतून त्यांचं नाव वगळण्यात आल्यासं समोर आलं आहे. त्यासाठी कार्यकारिणीच्या बैठकीत हा विषय झाला नसून सभासदत्वाचा ठराव मंजूर झाला नसल्याचे कारण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे.

या पार्श्वभूमीवर या निर्णयाविरोधात राजेभोसले यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली. महामंडळाच्या घटनेतील तरतुदी आणि इतर कागदपत्रांचा आधार घेत उच्च न्यायालयाने हा प्रश्न फक्त याचिकाकर्त्या सभासदांपुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट केले. संबंधित सभासदांना महामंडळाकडून ओळख पत्र दिले असून, वार्षिक शुल्कही भरले असताना त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आले आहे. असे केल्यामुळे तब्बल तीन हजारांवर मतदार मतदानाला मुकणार असल्याचा युक्तिवाद ॲड. नरवणकर यांनी या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केला.

2 हजार 852 पेक्षा जास्त सदस्यांची नावे वगळली
दुसरीकडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2 हजार 852 पेक्षा जास्त सदस्यांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. निवडणूक अधिकारी आसिफ शेख यांनी संबंधित असलेल्या आणि आवश्यक सदस्यत्व भरलेल्या 6255 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली होती. मतदार संपूर्ण महाराष्ट्रात विखुरले असून, पुणे आणि मुंबई येथील केंद्रांसह कोल्हापुरातील एबीएमसीएमच्या मुख्यालयात मतदानाची तरतूद करण्यात आली होती. मतदार यादीच्या प्रारूपावर आक्षेप घेण्यात आला. आणि आक्षेपांपैकी एक म्हणजे 2,852 सदस्य स्वीकारण्याचा ठराव प्रशासकीय मंडळाने कधीच मंजूर केला नाही.

Web Title: Stay on election processof akhul bhartiya marathi chitrapat mahamandal nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2023 | 05:08 PM

Topics:  

  • Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal
  • Entertainment News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा
1

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी
2

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी

Marathi Movie Release : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत
3

Marathi Movie Release : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास
4

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.