Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुख खानसोबत सुहानाचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, ‘द आर्चिज’ रिलीज होण्याआधी बाप-लेकीच्या चित्रपटाची चर्चा

 सुहाना खान शाहरुख खानसोबत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. रेड चिलीस निर्मित आणि सिद्धार्थ मॅरफ्लिक्ससह हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

  • By साधना
Updated On: Jun 27, 2023 | 03:29 PM
suhana and shahrukh khan

suhana and shahrukh khan

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने (Shahrukh Khan) आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावलंय. गेल्या काही दिवसांपासून, शाहरुख खानच्या डंकीनंतर पुढे काय ? याविषयी चर्चा सुरु होती. अखेर त्याच्या पुढच्या एका प्रोजेक्टविषयी माहिती मिळाली आहे. शाहरुख खान लेक सुहाना खानसोबत (Suhana Khan Debut) मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Bollywood News)

सुहाना खान शाहरुख खानसोबत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. रेड चिलीस निर्मित आणि सिद्धार्थ मॅरफ्लिक्ससह हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

किंग खानच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजोय घोष करणार आहे. सुजोय घोष हे ‘कहानी’, ‘कहानी २’, ‘बदला’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. याआधीही शाहरुख खान आणि सुजोय घोष यांनी एकत्र काम केलं आहे. सुजोय घोष दिग्दर्शित ‘बदला’ चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानने केली होती. ही जोडी आता पुन्हा नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. सुजोय घोषही नवीन शैलीत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.

रेड चिलीस आणि मॅरफ्लिक्सबद्दल अशी माहिती समोर येत आहे की, शाहरुख खान हा असा निर्माता आहे की ज्याला आंतरराष्ट्रीय चित्रपटाशी स्पर्धा करायला आवडते. तर सिद्धार्थ आनंद हा साहसी दृश्य असलेल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद ॲक्शन चित्रपटाची एकत्र निर्मिती करणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव असणार, यात वादच नाही.

सुहाना खानचे पदार्पण
सुहाना खान या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. यााधी झोया अख्तरच्या ‘द आर्चिस’ या चित्रपटातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित चित्रपटात शाहरुख खानची भूमिका आणि स्क्रीनटाइम हा डिअर जिंदगीवर आधारित असण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे लेखन सुरू असून फायनल पॉलिशिंग बाकी आहे. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनल जोमात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. रेड चिलीस् शाहरुख खानच्या नव्या पिढीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुख-सुहाना व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी कोण असणार हे अजून सांगण्यात आलेलं नाही.

चित्रपटाचे दिग्दर्शक सुजोयने यांनी ‘बदला’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूसोबत काम केले आहे. हा चित्रपट हिट ठरला तेव्हापासूनच शाहरूख खान सुजोयच्या संपर्कात होता. शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, 2024 मध्ये पुन्हा सिद्धार्थ आनंदसोबत काम करायला शाहरुख खान सज्ज आहे.  ‘टायगर’ आणि ‘पठान’नंतर आता शाहरुखचा नवीन सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Suhana khan to work with shahrukh khan in her first movie nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2023 | 03:26 PM

Topics:  

  • Entertainment News
  • shahrukh khan
  • Suhana Khan

संबंधित बातम्या

‘८ वाजून १३ मिनिटे’ पहिल्यांदाच सुनील बर्वे ऐश्वर्या नारकर एकत्र, वेब सिरीजचे Poster पाहून अंगावर येईल काटा
1

‘८ वाजून १३ मिनिटे’ पहिल्यांदाच सुनील बर्वे ऐश्वर्या नारकर एकत्र, वेब सिरीजचे Poster पाहून अंगावर येईल काटा

Aakhri Sawal चं स्पेशल स्क्रीनिंग; RSS चे जनरल सेक्रेटरी दत्तात्रेय होसबाले यांची विशेष उपस्थित
2

Aakhri Sawal चं स्पेशल स्क्रीनिंग; RSS चे जनरल सेक्रेटरी दत्तात्रेय होसबाले यांची विशेष उपस्थित

पुण्यात ‘स्पोकन पोइट्री’चा वाढता ट्रेंड; तरुणाईला मिळतेय अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ
3

पुण्यात ‘स्पोकन पोइट्री’चा वाढता ट्रेंड; तरुणाईला मिळतेय अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ

सूर्याने चिडवलं अन् चाहत्यांनी नाव जोडलं! Tilak Varma आणि Sreeleela च्या अफेअरच्या चर्चांवर सूत्रांचा मोठा खुलासा
4

सूर्याने चिडवलं अन् चाहत्यांनी नाव जोडलं! Tilak Varma आणि Sreeleela च्या अफेअरच्या चर्चांवर सूत्रांचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.