माजी प्रियकर Rohman Shawl सोबत दिसली सुष्मिता सेन, पाहा फोटो
बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनलीये. ही अभिनेत्री आता बिझनेसमन ललित मोदीला डेट करत आहे. मात्र याच दरम्यान सुष्मिता तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत मुंबईत दिसली. ब्रेकअपनंतर आता दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. अलीकडेच सुष्मिता, तिचा माजी प्रियकर रोहमन आणि मुलगी रेने सांताक्रूझमधील होम डेकोर बुटीकच्या बाहेर स्पॉट झाले होते. यानंतर आता त्यांचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.