Swapnil Joshi: यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी ठरला खास, नववर्षाची केली हटके सुरुवात
अभिनय आणि निर्मिती विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा स्वप्नील जोशी कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या स्वप्नीलचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. तो त्याच्या अपकमिंग चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून अभिनेत्याने यंदाचा गुढीपाडवा सण आणि नवीन वर्ष तो खास तऱ्हेन साजर करतोय. मराठी इंडस्ट्रीमध्ये, चित्रपट, नाटक, मालिका आणि ओटीटी यामध्ये काम करण्यासोबतच आता अभिनेत्याने गुजराती फिल्म इंडस्ट्रीतही डेब्यू केलं आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्याने गुजराती फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केलंय.
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरसाठी ‘यंदाचा गुढीपाडवा आहे खास’, नेमकं कारण काय?
‘नवरा माझा नवसाचा २’, ‘बाई गं’, ‘जिलबी’ आणि ‘चिकी चिकी बुबूम बुम’ सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर आता अभिनेता स्वप्नील जोशी गुजराती चित्रपटात काम करणार आहे. ‘सुशीला – सुजीत’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटासंबंधित माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो. २०२५ च्या सुरुवातीपासूनच अभिनेता आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांचं प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, स्वप्नील ‘गुढीपाडवा’च्या दिवशी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात गेला होता. तिथे त्याने चित्रपटाच्या टीमसोबत जल्लोषात सेलिब्रेशन केले आहे. स्वप्नील चित्रपटात अभिनेता आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका साकारणार असून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.
चित्रकार शशिकांत धोत्रेंचा ‘सजना’ चित्रपट येतोय, प्रदर्शनाची तारीख ठरली
स्वप्नील प्रमोशन दरम्या म्हणाला की, “दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा ‘गुढीपाडवा’ हा सण माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आणि खास आहे. कारण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी गिरगाव, दादर, ठाणे, डोंबिवली इथल्या नववर्ष शोभा यात्रा मध्ये जाऊन सहभाग घेतो आणि तिथला माहोल हा खरंच कमालीचा असतो. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी छान पारंपरिक अंदाजात सगळेच येतात हा एक उत्सव आहे असं मला वाटतं! यंदा हा गुढीपाडवा आम्ही ‘सुशीला – सुजीत’च्या टीमच्या सोबतीने पुण्यात साजरा करतोय. मुंबई सारखा पुण्यात देखील उत्साह असतो आणि तो अनुभवण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत” कामाचा व्याप असला तरी आपले सणवार मोठ्या दिमाखात साजरे करण्यासाठी स्वप्नील कायम उत्सुक असतो. आता ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाच्या टीमच्या सोबतीने स्वप्नील ‘शुभचिंतक’ या गुजराती चित्रपटात दिसणार आहे.