Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टेक इट इझी उर्वशी’ चित्रपटाचा शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रीमियर…

सनीभूषणच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'टेक ईट इझी उर्वशी' या मराठी चित्रपटाचा प्रीमियर दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाला. यासोबतच यंदा १२ महिन्यांत १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर नाट्यगृहात पार पडला.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 18, 2025 | 02:59 PM
'टेक इट इझी उर्वशी' चित्रपटाचा शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रीमियर...

'टेक इट इझी उर्वशी' चित्रपटाचा शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रीमियर...

Follow Us
Close
Follow Us:

मराठी रंगभूमीवर विश्वविक्रम करणाऱ्या रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात नायकाची भूमिका साकारत बच्चे कंपनीला अक्षरश: वेड लावणारा सनीभूषण मुणगेकर आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मराठी रंगभूमीवर लक्षवेधी कामगिरी करणारा सनीभूषण एक अनोखा प्रयोग करण्यासाठी सज्ज झाला आहे. सनीबॅाय एन्टरटेन्मेंटचा सनीभूषणच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टेक ईट इझी उर्वशी’ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाला. यासोबतच यंदा १२ महिन्यांत १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर नाट्यगृहात करण्याचा सनीभूषणचा मानस आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

महिला सशक्तीकरणाची प्रेरणादायी कथा सांगणाऱ्या ‘सौभाग्यवती सरपंच’वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज…

वेगवेगळ्या माध्यमातून मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपुढे पोहचवण्यासाठी जो प्रयत्न होतोय तो अत्यंत कौतुकास्पद आहे. अभिनेता सनीभूषण मुणगेकर याने त्यासाठी उचलेले पाऊल मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. त्याच्या या अनोख्या प्रयोगाला माझ्या मनापासून शुभेच्छा असं सांगताना अभिनेते विजय पाटकर यांनी मराठी चित्रपटांसाठी ठोस काहीतरी कृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल अभिनेता सनीभूषण मुणगेकर यांनी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह मंडळाचे आणि नवीन कल्पनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या निर्माते हरेश ठक्कर यांचे यावेळी आभार मानले.

मागच्या वर्षाच्या अखेरीस पुण्यामध्ये नाट्यगृहात मराठी चित्रपट दाखवण्यात आल्यानंतर आता मुंबईतही हा प्रयोग ‘टेक ईट इझी उर्वशी’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आला. सनीभूषण दिग्दर्शित, निर्मित आणि अभिनीत ‘टेक इट इझी उर्वशी’ या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच संपन्न झाला. या चित्रपटाचे निर्माते हरेश ठक्कर असून, सनीभूषणने निखिल कटारेच्या साथीने दिग्दर्शन केले आहे. कथा, पटकथा, संवाद सनीभूषण आणि महेश शिंदे यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात सनीभूषणचा डबल धमाका पाहायला मिळेल. यात सनीसोबत जनार्दन लवंगारे, नूतन जयंत, आनंदा कारेकर, सुचित जाधव, दीपाश्री कवळे, हर्षदा पिलवलकर आदी कलाकार आहेत. यांच्या जोडीला रंगभूमीवर काम करणाऱ्या नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे. श्री शिवाजी मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे कोणताही नवीन चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतो, पण हे सर्व चित्रपट गुरुवारी प्रदर्शित करण्याची योजना आहे. महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात चित्रपटांचा प्रीमियर होणार आहे. त्यानंतर नियमित शोज होतील.

सैफ अली खाननंतर ‘या’ ८ सेलिब्रेटींचा जीव धोक्यात? सरकारकडून मिळतेय X, Y आणि Z सिक्युरिटी

याबाबत सनीभूषण म्हणाला की, २०२४मध्ये मी एकूण १२ मराठी चित्रपट तयार केले आहेत. हे सर्व चित्रपट या वर्षात रिलीज होणार आहेत. यातील ‘टेक इट इझी उर्वशी’ हा पहिला चित्रपट आहे. या निमित्ताने प्रेक्षकांना नाट्यगृहात चित्रपट पाहण्याचा अनुभव घेता येईल. यासाठी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक उपकरणे वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून नाट्यगृहासाठी एक नवीन व्यवसाय सुरू होणार आहे. या निमित्ताने चित्रपटाशी निगडीत असलेल्या इतर छोट्या जोडधंद्यांनाही चालना मिळेल. यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. हृषिकेश मुखर्जी तसेच सत्यजीत रे यांच्या चित्रपटांसारख्या आर्ट फिल्ममेकर्सचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत विषयाला केंद्रस्थानी ठेवून हे चित्रपट बनवण्यात आले आहेत. यामुळे कुठेही बजेटची अडचण न येता कौटुंबिक मनोरंजक चित्रपट बनवता आले.

या उपक्रमातील १२ चित्रपट तयार असून, सर्व चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय सनीभूषणने केले आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या १२ चित्रपटांमध्ये विनोदाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळणार आहेत. यात ब्लॅक, सस्पेन्स, रोमँटिक, स्लॅपस्टिक, हॅारर, साय-फाय, नॅचरल कॅामेडीचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. ‘टेक इट इझी उर्वशी’, ‘सोलोमन आयलँड’, ‘वारसदार’, ‘जोडीचा मामला’, ‘अपना टाईम आएगा १’, ‘अपना टाईम आएगा २’, ‘अपना टाईम आएगा ३’, ‘एसएमएस – श्रीरंग मनोहर सूर्यवंशी’, ‘गण्या धाव रे’, ‘आले फंटर ‘, ‘आले फंटर रिटर्न्स’, ‘आले फंटर अगेन’ हे १२ चित्रपट यंदा प्रत्येक महिन्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सोमवार ते शुक्रवार नाट्यगृहात नाटकांचे फार प्रयोग होत नाहीत. त्या वेळेत चित्रपटाचे शोज दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न असेल.

Web Title: Take it easy urvashi film premiere at shivaji mandir theatre ambitious plan to release 12 films in 12 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film

संबंधित बातम्या

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’  कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…
1

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’ कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य
2

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित
3

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार
4

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.