अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनला विशेष ओळखीची गरज नाही. ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा २’ मुळे अभिनेता अल्लू अर्जुनच्या प्रसिद्धीझोतामध्ये वाढ झाली आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी अल्लू अर्जुन एक आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा अल्लू अर्जुन सध्या त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. २०२४ वर्षामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपट अव्वल होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चाहते अजूनही कौतुक करताना दिसत आहेत. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी तेलंगणा सरकारचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
प्रसिद्ध संगीत बँडमधील सदस्यांचे अपहरण, काही तासानंतर सापडले मृतावस्थेत; काय आहे संपूर्ण प्रकरण?
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चित्रपट डिसेंबर २०२४ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी करत केवळ कमाईचेच रेकॉर्ड मोडले नाहीत, तर सेलिब्रिटींना ग्लोबल स्टार बनवलं. तेव्हापासून अल्लू अर्जुनच्या चाहतावर्गामध्ये वाढ झाली असून त्याची फिल्मी कारकीर्दही एका नवीन उंचीवर गेलीय. अल्लू अर्जूनच्या करिअरची गाडी सध्या चांगलीच धावतेय. अशातच आता ‘पुष्पा २: द रूल’मधील दमदार भूमिकेसाठी त्याचा तेलंगणा सरकारतर्फे ‘गद्दार तेलंगणा फिल्म पुरस्कार २०२४’ अंतर्गत पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आलंय. ही खास बातमी अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना दिली आहे.
शहनाज गिलने ६ महिन्यामध्ये १२ किलो वजन कसं घटवलं ? वाचा तिचा Diet Plan
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन म्हणतो, “मला ‘पुष्पा २’साठी ‘गद्दार तेलंगणा फिल्म पुरस्कार २०२४’हा पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाल्याचा अभिमान आहे. तेलंगणा सरकारचे मन:पूर्वक आभार आहे. हा पुरस्कार माझे दिग्दर्शक सुकुमार गरू, निर्माते आणि संपूर्ण ‘पुष्पा’ टीमला समर्पित करतो. सर्वात मोठे आभार मी माझ्या चाहत्यांचे, तुमचं प्रेम आणि पाठिंबा मला सतत प्रेरणा देतं”, अशा शब्दात अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
अल्लू अर्जूनशिवाय, निवेथा थॉमसला ‘३५ चिन्ना कथा कडू’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, यासोबतच सर्वोत्तम वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट श्रेणीत ‘कल्की २८९८ एडी’, ‘पोटेल’ आणि ‘लकी भास्कर’ या तीन चित्रपटांचीही निवड करण्यात आली आहे. तर, नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे. गायिका श्रेया घोषाल देखील विजेत्यांमध्ये आहे. ती ‘पुष्पा २’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका ठरली आहे. सिद्धार्थ श्रीरामला ‘ऊरु पेरू भैरवकोना’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला आहे.चंद्र बोस यांची ‘राजू यादव’ चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शकाच्या श्रेणीत निवड झाली आहे.
आता खेळ सुरू…! करण जोहरच्या नव्या कोऱ्या ‘The Traitors’ चा ट्रेलर लाँच, उघडली अनेक गुपिते
नवीन नूली यांना ‘लकी भास्कर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार मिळाला आहे. अरविंद मेनन यांना ‘गामी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफरचा पुरस्कार मिळाला. त्याच वेळी, ‘कल्की २८९८ एडी’ साठी अदनितिन जिहानी चौधरी यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. तेलुगू चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने तेलंगणा गद्दर चित्रपट पुरस्कार सुरू केले आहेत. १३ मार्चपासून या पुरस्कार सोहळ्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि २९ मे रोजी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.