Bollywood Actress Shehnaaz Gill Weight Loss Diet Plan After Bigg Boss 13 How She Reduced 55 Kg
बिग बॉस १३ फेम शहनाज गिलला वेगळ्या प्रसिद्धीची गरज नाही. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. स्वघोषित ‘कतरिना कैफ’ म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फेमस असलेल्या शहनाज सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. जेव्हा शहनाज बिग बॉस १३ मध्ये आली, त्यावेळी तिचे वजन फार होते.
पण तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आपलं वजन झपाट्याने कमी केलं. त्यामुळे आता ती खूपच सुंदर दिसायला लागलीये. शहनाज गिलने निरोगी पद्धतीने तिचे वजन कसे कमी केले, जाणून घेऊया. शहनाजने सहा महिन्यांत ५५ किलो वजन कमी केले. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शहनाज गिलचा आहार कसा असतो, ती कोणते पदार्थ खायची ते जाणून घेऊयात.
शहनाजने तिच्या दिवसाची सुरुवात हळद टाकलेले कोमट पाणी आणि सफरचंदचं साईडर विनेगर प्यायची. त्यानंतर मेटाबॉलिजम आणि इम्युनिटी सिस्टिम वाढवण्यासाठी ती एक कप चहा सुद्धा प्यायची. त्यानंतर शहनाज रोज एक तास योगा करते. यामुळे तिचे मन शांत राहते आणि शरीर फिट आणि लवचिक राहते. शहनाजला प्रथिनेयुक्त नाश्ता करायला आवडतो. नाश्त्यामध्ये ती कमी तेलात बनवलेला डोसा मूग डाळ किंवा मेथीच्या भाजीचा पराठा खायची. कधीकधी ती भाज्या वापरुन बनवलेले पोहे सुद्धा नाश्ता करायची. किंवा कधी कधी अभिनेत्री ग्रॅनोला आणि दही सुद्धा नाश्ता करायची. शहनाज दुपारच्या जेवणात डाळ, ताजे सॅलेड, स्प्राउट्स, स्क्रॅम्बल टोफू आणि तूप लावलेली गव्हाची पोळी खाते. तिचे दुपारचे जेवण प्रोटीन, फायबर आणि न्यूट्रियंट्स अशा पोषक तत्वांनी भरलेला असते.
आता खेळ सुरू…! करण जोहरच्या नव्या कोऱ्या ‘The Traitors’ चा ट्रेलर लाँच, उघडली अनेक गुपिते
यामुळे तिचं पोट जास्त काळ भरलेले राहते. यातून तिला प्रथिने तसेच कार्बोहायड्रेट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर मिळतात. तर, शहनाज गिल रोजच्या संध्याकाळच्या नाश्त्याला तुपात भाजलेले मखाने खाते. त्यात फायबर, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि थोडी भूक लागली असेल तर पोटही भरते.तर, रात्रीच्या जेवणामध्ये शहनाज खिचडी, दही आणि दुधी भोपळ्याचे सूप पिते. हलका आहार घेतल्याने ब्लोटिंग, अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही आणि झोपही चांगली लागते. शहनाजच्या मते चांगली झोप आणि स्ट्रेसपासून दूर राहणं या गोष्टी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अभिनेत्री दिवसभर देखील खूप पाणी पिते आणि शरीराच्या गरजेनुसार डाएट आणि रूटीनमध्ये बदल करते.
ज्येष्ठ गीतकार-लेखक एचएस वेंकटेशमूर्ती यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, शहनाजने खुलासा केला की, लॉकडाऊनमुळे तिचे काम आणि आयुष्य थांबले होते, त्यामुळे तिने तिच्या वेळेचा जास्तीत जास्त वापर करण्याचा आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. तिने मुलाखतीत असाही खुलासा केला की, ‘बिग बॉस १३’ च्या घरात अनेकांकडून तिच्या वजनाची खिल्ली उडवली गेली होती.
शहनाजने सांगितले की, वजन कमी करण्यासाठी तिने काही खाण्यापिण्याचे पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले आणि तिचे वजन नियंत्रित केले. तिने यासाठी कोणताही व्यायाम केला नाही, याचाही तिने खुलासा केला. सहा महिन्यांत तिने ५५ किलो वजन कमी करण्यात यश मिळवले. शहनाजने सांगितले की तिने तिच्या आहारातून मांसाहारी पदार्थ, चॉकलेट आणि आईस्क्रीम काढून टाकले.