Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“एकोणवीस वर्ष झाली आमचा सांता जाऊन…”, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट

दिवंगत अभिनेते राजशेखर यांचं २५ डिसेंबर २००५ रोजी निधन झालं होतं. आज त्यांना जाऊन १९ वर्षे झाली आहेत. वडिलांच्या आठवणीत भावुक होत स्वप्नील राजशेखर यांनी भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 25, 2024 | 08:14 PM
"एकोणवीस वर्ष झाली आमचा सांता जाऊन…", प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट

"एकोणवीस वर्ष झाली आमचा सांता जाऊन…", प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेतल्या अधिपती, अक्षरा, भुवनेश्वरी आणि अधिपतीच्या वडिलांसह प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये अधिपतीच्या वडिलांची भूमिका अभिनेते स्वप्नील राजशेखर साकारत आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी इन्स्टाग्रामवर खास वडीलांसाठी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

नाताळनिमित्त अभिनेत्री कीर्ती शेट्टीचं खास फोटोशूट

स्वप्नील राजशेखर यांना आपल्या वडिलांपासूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेले आहेत. स्वप्नील राजशेखर हे दिवंगत अभिनेते राजशेखर यांचे चिरंजीव आहेत. दिवंगत अभिनेते राजशेखर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आज जरीही ते आपल्यात नसले तरीही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. खरंतर आज ख्रिसमस आहे आणि ख्रिसमसच्याच दिवशी अभिनेते राजशेखर यांचे निधन झाले. दिवंगत अभिनेते राजशेखर यांचं २५ डिसेंबर २००५ रोजी निधन झालं होतं. आज त्यांना जाऊन १९ वर्षे झाली आहेत. वडिलांच्या आठवणीत भावुक होत स्वप्नील राजशेखर यांनी भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“रंग माळीयेला…” कौमुदी वालोकरच्या हळदीतले पाहा सुंदर Photos!

 

आपल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करताना अभिनेते स्वप्नील राजशेखर म्हणाले की,

“आज एकोणवीस वर्ष झाली आमचा सांता जाऊन…

काळ सरत राहिला, वर्ष उलटत राहीली.. आयुष्य पुढे सरकत राहिलं…सुखदुःख येत राहिली…
२५ डिसेंबर २००५ च्या सकाळी पोटात आणि आयुष्यात पडलेला खड्डा आजही तसाच आहे..
तो भरला नाही, भरणारही नाही कधी…

“डोक्यावरचं आभाळ फाटलं, पाया खालची जमीन निसटली, पोकळी निर्माण झाली “ या आणि अशा पुस्तकी उपमा किती थिट्या आहेत हे क्षणोक्षणी जाणवावं असं फिलींग आहे आपला बाप या जगात नसण्याचं…

गेली १९ वर्ष सतत एक विचार मन पोखरत रहातो की…
पप्पा होते तेव्हा किती संधी होती माझ्याकडे त्यांना भरभरून भेटायची, बोलायची, त्याना स्वतःमधे साठवुन घेण्याची…
आणि किती निरर्थक, निरुपयोगी आणि भंगार गोष्टीत वेळ घालवला असेल मी पप्पा हयात असताना त्यांना वेळ न देता…

उद्या कधी टाईम ट्रॅव्हल शक्य झाला तर मी त्यांचं जाणं थांबवणार नाही कदाचीत, पण त्याआधीचा मॅक्सीमम काळ पप्पांच्या बरोबर घालवेन… त्यांचा स्पर्श आणखी आणखी साठवेन स्मृतीत…
तो उबदार आश्वासक स्पर्श..

“मी आहे रे.. तु जिंकलास, हरलास, पडलास, चुकलास, माती खाल्लीस, रडलास,.. सगळ्यात मी आहे तुझ्याबरोबर”
हे सांगणारा..

पण च्यायला.. ही सगळी पश्चात बुध्दी आहे…
एरवी माणसाचं असणं गृहीतच धरतो आपण..

असो.. पप्पा तसे सोबत आहेत म्हणा..
गरजेच्या वेळी डोळे मिटुन हात पुढे केला की त्यांचा स्पर्श हातात शब्दशः जाणवतो..
सुदैवाने तेवढी पोतडी भरलेलीय आपली…

बाकी तो चलता है.. दुनिया है..

पण १९ वर्षात एक झालंय, कोणाचेही आईवडील गेल्याचं कळलं, की माझ्याही आतमधे तुटतं काहीतरी… त्याच्याबद्दल कणव दाटुन येते..

हल्लीच एका सुहृदाचे वडील गेले..
मी ठरवुन बऱ्याच दिवसांनी भेटलो त्याला..
बाकी काही बोलण्यासारखं नव्हतच..
मी त्याच्या पाठीवर हात ठेवुन
“welcome to the club” म्हणालो…

तो खोल बघत राहिला माझ्याकडे…

Merry Christmas”

गुबगुबीत गाल अन् गोंडस हास्य; बाबा रणबीर कपूरच्या कडेवर बसून राहा कपूरचे क्यूट फोटो पोजेस

Web Title: Television actor swapnil rajshekhar remembering late actor and father rajshekhar shares post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 08:14 PM

Topics:  

  • marathi actor
  • zee marathi

संबंधित बातम्या

Video : “एक नंबरा मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात
1

Video : “एक नंबरा मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात

मराठमोळ्या आशिष वारंगचा जगाला अलविदा! हिंदी चित्रपटातही दाखवली होती चमक
2

मराठमोळ्या आशिष वारंगचा जगाला अलविदा! हिंदी चित्रपटातही दाखवली होती चमक

Zee Marathi Awards 2025: बाप्पाच्या चरणी, ढोल-  ताशाच्या गजरात मतदान प्रक्रियेचा भव्य शुभारंभ!
3

Zee Marathi Awards 2025: बाप्पाच्या चरणी, ढोल- ताशाच्या गजरात मतदान प्रक्रियेचा भव्य शुभारंभ!

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
4

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.