बॉलिवूड स्टारकिड्समधलं सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे राहा कपूर... अवघ्या दोन वर्षांचीच असलेल्या राहाने आपल्या ओव्हरलोड क्यूटनेसने सर्वांचेच लक्ष वेधले. गेल्या वर्षी ख्रिसमसच्याच मुहूर्तावर आलियाने आणि रणबीरने आपल्या चाहत्यांना लेक राहाचा चेहरा दाखवला होता. तिच्या क्यूटनेसची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा २०२४ च्या ख्रिसमसमध्ये रणबीर-आलियाने राहाला सर्वांसमोर आणलंय. यावेळी राहा पहिल्यांदा मीडियासमोर बिनधास्त बोलताना दिसली.
Christmas Special Raha kapoor Cute Photos
राहाही बॉलिवूडच्या स्टारकिड्समधली सर्वात लहान असलेली आणि सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. तिची कायमच सोशल मीडियावर चर्चा होत असते. तिच्या क्यूटनेसने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. राहाचे क्यूट फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या एक्सप्रेशनची कमालीची चर्चा होत आहे.
राहाचे 'व्हिरल भयानी'च्या इन्स्टाग्राम पेजवर फोटोज शेअर करण्यात आलेले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये राहा वडिलांच्या कडेवर बसलेली पाहायला मिळत आहे. ती सर्व माध्यमांना हाय करताना दिसत असून पहिल्यांदाच मीडियासमोर बिनधास्त बोलताना दिसली.
राहाने सर्वांना 'हाय' म्हणत 'मेरी ख्रिसमस'ही म्हणाली. तिच्या बिनधास्तपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व्हायरल असलेल्या फोटोंमध्ये राहाने व्हाईट कलरचा फ्रॉक वेअर केलेला दिसत आहे. तर रणबीर- आलियाच्या लूकबद्दल बोलायचे तर, रणबीरने ब्लॅक शर्ट आणि व्हाईट टीशर्ट आणि जीन्स तर आलियाने स्टायलिश वेस्टर्न रेड कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे.
रणबीर, आलिया आणि राहा असं तिघांनीही एकत्र माध्यमांसमोर फोटोशूट केले. राहाचा हा सिंपल अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून तिच्या लूकचे जोरदार कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात असून तिच्या क्यूटनेसचे कौतुक केले जात आहे.
राहाच्या क्यूट वागण्याने सर्वांना चांगलंच सरप्राइज केलं. फोटोशूट झाल्यावर रणबीर-आलियाला राहाला गाडीत घेऊन जाते. त्यावेळी राहा सर्वांनाच बाय करताना दिसते. राहा सर्वांना बाय म्हणत फ्लाइंग किसही देते. राहाच्या या क्यूट व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.